खेळ व क्रीडा

फक्त आठ धावांनी हुकले शतक पण रचला इतिहास

Spread the love

 

फक्त आठ धावांनी हुकले शतक पण रचला इतिहास, रोहित की भन्नाट कामगिरी

चंदीगड / क्रीडा प्रतिनिधी

          भारताचा माजी कर्णधार आणि हिटमॅन म्हणून प्रसिद्ध असलेल्या रोहित शर्माचे शतक केवळ ८ धावांनी हुकले आहे.असे असले तरी त्याने आणखी एक विक्रम आपल्या नावे केला आहे. त्याने २२ वर्ष जूना सचिन तेंडुलकर चा विक्रम मोडीत काढला आहे.

वेस्ट इंडिजविरुद्ध न्यू चंदीगड येथे खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात हिटमॅनचे शतक अवघ्या ८ धावांनी हुकले. मात्र, तरी देखील त्याने ‘क्रिकेटचा देव’ सचिन तेंडुलकरचा तब्बल २२ वर्षे जुना विश्वविक्रम मोडला. यासह एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलामीवीर (ओपनर) म्हणून १०,००० धावा पूर्ण करणारा रोहित शर्मा हा जगातील अवघा चौथा फलंदाज ठरला आहे.

सचिनपेक्षा १२ डाव आधीच गाठला टप्पा; रचला नवा इतिहास!

 

सलामीवीर म्हणून सर्वात जलद १०,००० धावा करण्याचा विक्रम आतापर्यंत सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. सचिनने २००४ मध्ये ब्रिस्बेन येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध हा टप्पा २१४ डावांत गाठला होता. रोहित शर्माने सचिनपेक्षा १२ डाव कमी खेळत अवघ्या २०२ डावांमध्ये सलामीवीर म्हणून १०,००० धावांचा डोंगर उभा केला. या विक्रमी क्लबमध्ये सचिन तेंडुलकरव्यतिरिक्त श्रीलंकेचा सनथ जयसूर्या आणि वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल यांचा समावेश आहे.

सलामीवीर म्हणून सर्वाधिक धावा; जयसूर्या आणि गेल रडारवर!

एकदिवसीय क्रिकेटमध्ये ओपनर म्हणून सर्वाधिक धावांचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या (१५,३१० धावा) नावावर आहे. त्यानंतर सनथ जयसूर्या (१२,७४० धावा) दुसऱ्या तर ख्रिस गेल (१०,१७९ धावा) तिसऱ्या स्थानावर आहे. आता १० हजार धावांचा टप्पा ओलांडल्यानंतर रोहित शर्माची नजर ख्रिस गेलला मागे टाकण्यावर असेल. विश्वचषकापूर्वी रोहित गेलला मागे टाकून थेट जयसूर्याच्या विक्रमाच्या जवळ पोहोचू शकतो.

एकदिवसीय कारकिर्दीत १२ हजारांहून अधिक धावा; ३५ शतके पूर्ण!

रोहित शर्माने आपल्या संपूर्ण एकदिवसीय कारकिर्दीत १२ हजारहून अधिक धावा पूर्ण केल्या असून त्याच्या खात्यात ३५ शतके आणि ३५ अर्धशतके जमा आहेत. मागील सामन्यात त्याने अवघ्या ७५ चेंडूंत १० चौकार आणि ६ षटकारांसह १०१ धावांची शतकी खेळी केली होती. मात्र, सलग दुसऱ्या सामन्यात शतक झळकावण्याची संधी हुकली. तो ८५ चेंडूंत १० चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ९२ धावा काढून झेलबाद झाला. न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी मालिकेसाठी रोहित सज्ज असून विश्वचषकाच्या दृष्टीने त्याचा हा फॉर्म भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close