क्राइम

कोचिंग क्लास मधील विद्यार्थ्यांना स्वतःचे निर्वस्त्र फोटो पाठविणाऱ्या महिले विरोधात गुन्हा दाखल

Spread the love
 

नागपूर / विशेष प्रतिनिधी 

 
नागपूरमधील एका खाजगी कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये काम करणाऱ्या २३ वर्षीय महिला कर्मचाऱ्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आयआयटी-जेईई आणि नीट सारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या अनेक अल्पवयीन विद्यार्थ्यांना स्वतःचे निर्वस्त्र फोटो आणि व्हिडिओ पाठवल्याचा आरोप तिच्यावर आहे.

विद्यार्थ्यांना स्वतःचे आक्षेपार्ह फोटो पाठवले

ही घटना जुलै महिन्यात घडल्याचे सांगण्यात येत आहे, परंतु १३ नोव्हेंबर रोजी ‘चाइल्ड हेल्पलाइन १०९८’ वर एका विद्यार्थ्याचा फोन आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्या विद्यार्थ्याने आरोप केला की, संबंधित महिला त्याला आणि इतर अनेक विद्यार्थ्यांना स्वतःचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ पाठवत होती. त्यानंतर पोलिसांनी तपास करून ‘पोक्सो’ कायदा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

झोनल डीसीपी रमेश धुमाळ यांनी सांगितले की, “पोलिसांनी संबंधित व्यक्तींचे जबाब नोंदवले असून, अधिक पुरावे गोळा केले जात आहेत. तसेच, या प्रकारामुळे बाधित झालेल्या सर्व अल्पवयीन मुलांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. पडताळणीदरम्यान काही फोटो आणि व्हिडिओही सापडले आहेत.”

लैंगिक छळ व खंडणी रॅकेटच्या दिशेनेही तपास

तक्रार प्राप्त झाल्यानंतर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण यांनी चौकशीचे आदेश दिले. केस सुपरवायझर पूजा कांबळे आणि त्यांच्या टीममधील मीनाक्षी धडाडे यांनी तपासादरम्यान माहिती गोळा केली आणि १४ नोव्हेंबर रोजी जुन्या कामठी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close