क्राइम

फोन न उचलल्याचा राग , कथित प्रेयसीला आयुष्यातून केले बाद

Spread the love

सांगली / विशेष प्रतिनिधी 

                कथित प्रेयसी कॉल रिसिव्ह करत नसल्याने प्रियकर इतका संतापला की त्याने प्रेयसीच्या घरी जाऊन तिच्या आईसमोर तरुणीवर चाकूने सपासप वार करून तिची हत्या केली. पोलिसांनी कथित प्रियकर आणि त्याच्या साथीदाराला अटक केली आहे.              

 सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील कंठी गावालगत असलेल्या मोठेवाडी येथील खरात वस्तीवर एका ३० वर्षीय विवाहित महिलेचा धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना रविवारी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास घडली.

राजाक्का काशीराम खरात (वय ३०) असे खून झालेल्या विवाहित महिलेचं नाव आहे. प्रेमसंबंधातून आणि भेटण्यास नकार दिल्याच्या रागातून प्रियकरानेच ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून, या घटनेने संपूर्ण कंठी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजाक्का यांचे माहेर जत तालुक्यातील बागेवाडी येथील असून, त्यांचा विवाह आठ वर्षांपूर्वी कंठी येथील त्यांचे नातेवाईक काशीराम खरात यांच्याशी झाला होता. तसंच तिचे आई-वडीलही कंठी येथेच वास्तव्यास आहेत. दरम्यान राजाक्का या उच्चशिक्षित असून पुणे येथील एका खासगी शिक्षण संस्थेत काम करण्याबरोबरच खासगी क्लासेसही घेत असल्याची माहिती आहे. दिवाळीच्या सुट्टीनिमित्त त्या सुमारे दहा दिवसांपूर्वी गावी आल्या होत्या. परंतु राजाक्का यांचे कंठी परिसरातील एका तरुणासोबत गेल्या पाच वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

रविवारी संबंधित तरुणाने राजाक्का यांना वारंवार फोन केले. मात्र, त्यांनी फोन न उचलल्याने संतप्त झालेल्या तरुणाने आपल्या एका साथीदारासह थेट खरात वस्तीवरील त्यांच्या घरी धाव घेतली. यावेळी मुख्य संशयित आरोपीने राजाक्का यांच्या पोटावर तसेच शरीराच्या अन्य भागांवर धारदार सुरा आणि चाकूने सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या राजाक्का यांचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, ही संपूर्ण घटना त्यांच्या आईसमोर घडल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच जत पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरा उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले आणि पोलीस निरीक्षक विजय घेरडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तर या खून प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत संशयित मुख्य आरोपी मनोज हिम्मतराव कोळेकर (वय, ३० रा. कंठी) आणि त्याच्या एका साथीदाराला ताब्यात घेतले आहे. घटनेमागील नेमके कारण, हत्येचे स्वरूप आणि इतर बाबींचा पोलीस तपास करीत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close