क्राइम

मुली पटवण्याची पैज आणि आपसी वाद यामुळे आले प्रकरण उघडकीस 

Spread the love
अमरावती / विशेष प्रतिनिधी

 
                अमरावती जिह्यातील परतवाडा येथून अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड होताच जिल्ह्यात नव्हे तर राज्यात खळबळ माजली होती. तपासात आता अनेक बाबी समोर येत आहेत. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार अयान अहमद आणि उझर खान यांनी आपसात लावलेली पैज आणि आपसी वाद यामुळे ही प्रकरण उजेडात आले आहे. 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अयान अहमद आणि उझर यांच्यात पैजरुपी ‘शर्यत’ लागली होती की, आपल्यापैकी कोण अधिक मुलींना मोहात पाडू शकेल. पुढे या शर्यतीचे रुपांतर एका विकृत छंदात झालं. दोघं आपल्या ‘कृत्यां’चं चित्रीकरण करायचे आणि ते व्हिडिओ ऑनलाइन अपलोड करायचे.

वादानंतर रागात व्हिडिओ अपलोड

अयानचा परिचित असलेल्या एका स्थानिक राजकारण्याने सांगितलं की, अयान आणि उझर यांच्यात पैशांवरुन वाद झाला होता. त्यानंतर उझरने संतापाच्या भरात ते व्हिडिओ ऑनलाइन अपलोड केले. अयान अहमद हा एमआयएमचा माजी सदस्य आहे. तो अमरावतीसाठी पक्षाच्या सोशल मीडियाचे कामकाज सांभाळत असे.

माफी मागून निघाला

अचलपूर नगर परिषदेचे नगरसेवक मुजीब रशीद यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन आठवड्यांपासून अयान अहमदचे व्हिडिओ व्हायरल होण्यास सुरुवात झाली होती. “दहा दिवसांपूर्वी मला या व्हायरल व्हिडिओंबद्दल समजलं होतं, तरीही मी ते प्रत्यक्ष पाहिलं नव्हतं. मी त्याला गाठलं; त्याने माझी वारंवार माफी मागितली. ज्या वयात त्याने अभ्यासावर लक्ष केंद्रित करायला हवं, त्या वयात मुलींच्या मागे लागून तो आपले आयुष्य उद्ध्वस्त करत आहे, असा इशारा मी त्याला दिला. अयानने आपली वर्तणूक सुधारण्याचे वचन दिलं आणि तो तिथून निघून गेला” असं रशीद म्हणाले.

रशीद यांना कल्पना नव्हती की, हा काही दोन सज्ञान प्रेमी युगुलांचा चुकून लीक झालेला व्हिडिओ नव्हता, तर १८ लैंगिक व्हिडिओ आणि ३९ आक्षेपार्ह फोटोंची एक मालिका होती, तिचं रुपांतर पुढे जाऊन लैंगिक शोषण आणि ब्लॅकमेलिंगमध्ये झालं.

या लैंगिक शोषणाचा सूत्रधार अयान अहमद हा अचलपूर येथील एका महाविद्यालयात दुसऱ्या वर्षाला शिकत होता. पीडित मुली या वेगवेगळ्या शहरांमधील होत्या आणि त्या बहुधा याच महाविद्यालयात शिक्षणासाठी आल्या असाव्यात.

व्हिडिओ उझरला कसे मिळाले

रशीद म्हणाले, “आम्हाला असं समजले की, अयान अहमदचे काही खाजगी व्हिडिओ उझरच्या ताब्यात होते. हे दोघं या गुन्ह्यात एकमेकांचे साथीदार होते, की उझरने अहमदच्या फोनवरुन ते व्हिडिओ मिळवले होते, याबद्दल मला काहीच माहिती नाही. परंतु, मला असं सांगण्यात आलं आहे की उझरने काही आर्थिक मागण्या केल्या होत्या, त्या पूर्ण करणं अयानला शक्य झाले नाही. आणि त्यानंतर उझरने आपली धमकी खरी करुन दाखवत ते व्हिडिओ व्हायरल केले.

आता पोलीस या आरोपींची कसून चौकशी करत असताना, पीडित मुलींकडून साक्ष मिळवणे हे त्यांच्यासमोरील एक मोठं आव्हान ठरत आहे; कारण या मुलींना सामाजिक बदनामीची भीती वाटत आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close