क्राइम
TCS कंपनीत झालेल्या लैंगिक शोषण, धर्मांतरण आणि बलात्कार प्रकरणातून चर्चेत आलेली निदा खान कोण ?

या प्रकरणात निदा खान मास्टर माईंड असल्याचा पोलिसांना संशय
नाशिक / विशेष प्रतिनिधी
नाशिक येथील TCS कंपनीत घडलेल्या प्रकारामुळे संपूर्ण राज्य हादरून गेले आहे. या कंपनीत कार्यरत एका महिलेने दिलेल्या तक्रारी नंतर एका विशिष्ट समाजाच्या लोकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. आठ महिला आणि एक पुरुष कर्मचाऱ्याने दिलेल्या तक्रारी नंतर या लोकांवर एकूण नऊ गुन्हे दाखल झाले आहेत. पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारींमधून कंपनीतील घटनाक्रमाविषयी धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
तरुण-तरुणींना आपल्या जाळ्यात अडकवण्याची नाशिकमधील कंपनीतील ही मोडस ऑपरेंडी आता समोर आली आहे. महिला कर्मचाऱ्यांना मानसिक दबावाखाली ठेवण्यासाठी संशयित आरोपी वेगवेगळे उपाय करत असल्याचं स्पष्ट झालं आहे. आपली मोहीम फत्ते करण्यासाठी हे संशयित कामाची वेळ संपल्यानंतरही अधिक वेळ कंपनीत थांबून कंपनीचे काम करत असल्याचे भासवत असत आणि संशयास्पद प्रकार करत असल्याचंही तपासातून उघड झालं. याकरिता कंपनीच्या मालमत्तेचाही वापर करण्यात आला. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून रणनीती आखल्यानंतर हे ऑपरेशन राबवले जात असे.
सर्वात पहिला गुन्हा हा नाशिकच्या देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात दाखल झाला. यात कंपनीत काम करणाऱ्या २५ वर्षीय महिला कर्मचारी हिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करण्यात आले होते. धर्मांतरण करण्याचा दबाव देखील टाकण्यात आला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यातच मुंबईनाका पोलीस ठाण्यात देखील एक महिला कर्मचाऱ्याने विनयभंग केल्या प्रकरणी तक्रार नोंदविली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथील कामाला असलेल्या एका २५ वर्षीय महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलिसांनी दोन पुरुष सहकाऱ्यांसह एका महिला वरिष्ठ अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, मुख्य आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्याबाबतची तक्रार पीडित महिलेने दिली आहे.
पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, पीडित महिला ही ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ काम करत होती. १ मे २०२३ ते १९ मार्च २०२६ या कालावधीत संशयित आरोपी रझा रफीक मेमन आणि शाहरुख हुसेन शौकत कुरेशी यांनी पीडितेशी गैरवर्तन केले होते. आरोपी रझा याने पीडितेच्या मनास लज्जा वाटेल असे कृत्य करून तिच्या वैयक्तिक वैवाहिक आयुष्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते, तर, शाहरुख कुरेशी याने पीडितेकडे जेव्हा ती कामावर साडी घालून आलr होती त्यावेळी तिच्याकडे वाईट नजरेने टक लावून पाहत तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल, असं कृत्य केलं होतं. एवढ्यावर न थांबता त्याने पीडितेला फिरायला येण्याबाबत देखील विचारणा केली असल्याचे पीडितेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, पीडितेने या त्रासाबाबत तिची टीम लीडर संशयित अश्विनी अशोक चैनानी यांच्याकडे वारंवार तोंडी तक्रार केली होती. मात्र, चैनानी यांनी या तक्रारीची दखल न घेता उलट आरोपींच्या कृत्यास चिथावणी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ७५, ७८, ७९, ४९, ३५६ आणि ३(५) अन्वये गुन्हा (क्र. १६३/२०२६) दाखल करण्यात आला आहे. संशयित रझा मेमन आणि शाहरुख कुरेशी यांना अटक करण्यात आली असून, सध्या हे दोघे आणि त्यांच्या इतर साथीदारांना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणात मुख्य नाव समोर येत आहे ते निदा खान हिचे पोलिसांच्या मते निदा खान हिच या प्रकरणातील मास्टर माईंड आहे. कारण निदा खान ही नाशिक TCS बिपिओ युनिट मध्ये प्रबंधकीय एच आर पदावर होती. ती कंपनीच्या तक्रार निवारण समितीत सदस्य होती. कर्मचाऱ्यांच्या तक्रारी चे निराकरण करणे , कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षा उपलब्ध करणे, आणि लैंगिक अत्याचार अधिनियम अंतर्गत अनिवार्य प्रोटोकॉल चे पालन करायची जबाबदारी निदा हिच्यावर होती. अन्य माहिती नुसार ती पुणे शी संबंधित होती.आणि तिने जानेवारी २०२६ मध्ये कंपनी सोडली होती.
निदा खान वर आरोप काय ?
निदा खान हिचेवर कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप आहे. तिने ७८ इमेल आणि चॅटिंग कडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे. तक्रारी वरिष्ठांकडे पोहचवणे आवश्यक होते. पण तिने तसे केले नाही. उलट कॉर्पोरेट जगतात हे सगळे होत असते असे तिचे म्हणणे असल्याचा आरोप पीडित महिलांनी केला आहे.


