क्राइम

तरुणाला GRP ने पकडले आणि अडकले चार जवान 

Spread the love

विशेष प्रतिनिधी/बिलासपूर 

                     देशात कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही पोलिसांची असते. पण यातीलच काही लोक वरकमाई साठी त्यांच्या कर्तव्या पासून विमुख होत असल्याचे काही प्रकरण समोर येत असतात. असाच एक प्रकार बिलासपूर येथे घडला आहे. येथे गांज्यांचा व्यवसायात मदत करणाऱ्या चार पोलिसांना अटक करण्यात आली आहे.

बिलासपूर इथं एक तरुण गेल्या एक वर्षापासून भाड्याच्या घरात राहत होता. तो रोज बिलासपूर रेल्वे स्टेशनवर जात असे. 24 ऑक्टोबर रोजी जीआरपीने त्याला पकडलं. त्यानंतर असं गुपित उघड झालं की रेल्वेत खळबळ उडाली. जीआरपीच्या चार हवालदारांना पोलिसांनी अटक केली.

गणवेशाच्या वेशात तरुणाकडून गांजाची तस्करी करणाऱ्या चार जीआरपी हवालदारांना सायबर पोलिसांनी अटक केली आहे. यापैकी दोन हवालदारांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे, तर दोन हवालदारांना पोलिस कोठडीत घेऊन त्यांची चौकशी सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 24 ऑक्टोबर रोजी बिलासपूर रेल्वे स्टेशनवर जीआरपीने जबलपूरचा रहिवासी योगेश सोंढिया आणि चित्रकूटचा रहिवासी रोहित द्विवेदीला 20 किलो गांजासह पकडलं होतं. या प्रकरणाची डायरी पोलीस मुख्यालयातून बिलासपूर एसपी कार्यालयात तपासासाठी पाठवण्यात आली होती. बिलासपूरचे एसपी रजनीश सिंह यांच्या सूचनेवरून सायबर पोलिसांनी तपास सुरू केला. गांजा तस्करीच्या आरोपाखाली पकडले गेलेले योगेशआणि रोहित यांची कसून चौकशी करण्यात आली.

गेल्या एक वर्षापासून शहरात भाड्याच्या घरात राहत असल्याचं योगेश सोंढियानं सांगितलं. जीआरपी पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल लक्ष्मण गेन, सौरभ नागवंशी, संतोष राठोड आणि मन्नू प्रजापती यांच्या सांगण्यावरून तो ओडिशाहून गांजा आणतो आणि त्यांच्या संरक्षणात रेल्वे स्टेशनमध्ये विकतो. विक्रीची रक्कम तो हवालदारांना देत असे. या प्रकरणात अडकलेला रोहित द्विवेदी त्या दिवशी गांजा खरेदी करण्यासाठी आला होता.

आरोपीच्या जबानीच्या आधारे पोलिसांनी चार हवालदारांना एनडीपीएस कायद्यान्वये अटक करून न्यायालयात हजर केलं. पोलिसांनी चौकशीसाठी दोन हवालदारांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. कोर्टाच्या आदेशावरून कॉन्स्टेबल संतोष राठोड आणि लक्ष्मण गाईन यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर हवालदार सौरभ नागवंशी आणि मन्नू प्रजापती यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

बिलासपूरचे एसपी रजनीश सिंह म्हणाले, ‘हे प्रकरण 24 ऑक्टोबरला समोर आलं. बिलासपूर रेल्वे स्थानकावर दोन मुलांना गांजासह पकडण्यात आलं. जीआरपीचे काही कर्मचारीही यात सहभागी असल्याचा संशय असल्याने या दोघांची कसून चौकशी करावी, असं गुप्तचर यंत्रणेकडून सांगण्यात आलं. पश्चिम बंगाल आणि ओडिसा येथून गांजा रेल्वेने यायचा. दोघंही बोगीत गांजा घेऊन जायचे. जीआरपी कर्मचारी मदत करत होते. जीआरपी कर्मचाऱ्याच्या मदतीने गांजा विकण्यात आला. जीआरपीच्या चार हवालदारांना ताब्यात घेतलं. गेल्या तीन वर्षांपासून सर्व हवालदार या भ्रष्टाचारात गुंतले होते. संपूर्ण प्रकरण जीआरपीकडून बिलासपूर पोलिसांकडे सोपवण्यात आले. पोलीस सर्व आरोपींवर कडक कारवाई करत आहेत.

4 निरीक्षकांचं पथक तपासासाठी तैनात करण्यात आलं आहे. ते सर्व वस्तुस्थिती तपासत आहेत. या भ्रष्टाचारात कोण कोण सहभागी आहे आणि किती दिवसांपासून करत होते, या सर्व बाबींचा तपास सुरू आहे, असंही त्यांनी सांगितलं.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close