हटके

CRPF कमांडो पती आणि पोलीस कर्मचारी पत्नीचा रेल्वे स्टेशनवरच राडा 

Spread the love

पाटणा ( बिहार) / नवप्रहार डेस्क

                 मागील एक महिन्या पासून बिहार पोलिसात कॉन्स्टेबल पदावर असलेली पत्नी बेपत्ता असल्याने पती तिचा शोध घेत होता. तिच्या सोबत मोबाईल वर देखील संपर्क होत नव्हता. त्यामुळे तिला सूचना न देता CRPF मध्ये कार्यरत पती पाटणा पोहचला. त्याने तिला अन्य पुरुषा सोबत पाहिले. पतीला पाहताच पत्नीने तिच्या सोबतच्या पुरुषाला दूर राहायला इंगित केले. पण हा सगळा प्रकार नवऱ्याने बघितला. आणि त्यांच्यात स्टेशनवरच राडा सुरू झाला.

 पती पेशाने CRPF जवान तर त्याची पत्नी बिहार पोलीस आहे. पाटणा रेल्वे स्थानकात बुधवारी रात्री उशीरा पती-पत्नी यांच्यात हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. खरे तर बिहार पोलिसात कार्यरत असणारी महिला हवालदार पाटणा-सिंगरोली एक्सप्रेस ही गाडी पकडण्यासाठी आली होती. अशातच तिचा पतीदेखील तिथे पोहोचला. महत्त्वाचे म्हणजे, आपली पत्नी अन्य दुसऱ्या व्यक्तीसोबत दिसताच पतीचा पारा चढला.

सीआरपीएफ जवान असलेल्या पतीने आपली आपबीती सांगताना बघ्यांसमोर व्यथा मांडली. एक महिन्यापासून पत्नी गायब होती. तिच्याशी संपर्क होत नव्हता. पण, इथे ती दिसली पण तिच्यासोबत आणखी एक व्यक्ती होता. मला पाहताच तिने त्याला दूर होण्यास सांगितले आणि तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला, असे पतीने सांगितले. दरम्यान, सीआरपीएफ जवानाने पत्नीच्या प्रियकराची धुलाई केली. मग तो फरार होताच पती-पत्नी ट्रेनने पुढे निघून गेले.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये पीडित जवानाचा संताप पाहायला मिळतो. तुझ्यासोबत असणारा व्यक्ती कोण होता? अशी विचारणा करताना तो दिसतो. मात्र त्याची पत्नी अर्थात महिला पोलीस हवालदाने या प्रश्नावर मौन बाळगले. सुरुवातीला पत्नीने आपल्या पतीला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतापलेल्या जवानाने पत्नीसोबत दिसलेल्या व्यक्तीवर शाब्दिक हल्ला चढवला. याशिवाय त्याने मारहाण करत जमलेल्या गर्दीसमोर आपण सीआरपीएफ जवान असल्याचे सांगून त्या व्यक्तीला चोप दिला.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close