अपघात

ट्रॅव्हल्स आणि दुचाकी अपघात, ट्रॅव्हल्स ने पेट घेतल्याने ट्रॅव्हल्स जाळून खाक

Spread the love

अपघाता नंतर दुचाकी ट्रॅव्हल्स खाली आल्याने ट्रॅव्हल्स चे टायर फुटून ट्रॅव्हल्स ने घेतला पेट 

अकोला / विशेष प्रतिनिधी

                खाजगी बस (ट्रॅव्हल्स) आणि दुचाकी मध्ये झालेल्या अपघातात ट्रॅव्हल्स जळून खाक झाल्याची घटना बाळापूर – शेगाव मार्गावर घडली आहे. दुचाकी ट्रॅव्हल्स खाली आल्याने ट्रॅव्हल्स चे दोन्ही टायर फुटले.आणि धूर निघायला सुरवात झाली व पाहता पाहता ट्रॅव्हल्स ने पेट घेतला. सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झाली नाही.

नेमकं घडल काय?

स्वस्तिक ट्रॅव्हल्सची खासगी बस इंदूरहून अकोल्याकडे येत होती. शेगाव ते बाळापूर मार्गावर अचानक एक दुचाकी बसखाली येऊन अपघात झाला. या अपघातात बसचे टायर फुटले आणि दुचाकी बसच्या खाली अडकली. या अपघातानंतर बसमधून धूर निघू लागला. प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. सर्व प्रवासी, चालक क्लिनर बसमधून खाली उतरले. काही वेळातच बसने पेट घेतला.

 

क्षणार्धात आगीने रौद्ररुप धारण केले. घटनास्थळी मोठा गोंधळ उडाला. या घटनेची माहिती महामार्ग पोलीस, बाळापूर, शेगाव येथील अग्निशमन विभागाला देण्यात आली. अग्निशमन विभागाने घटनास्थळावर धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत बस जळून भस्मसात झाली. या दुर्घटनेत बसमधील सर्व प्रवासी, चालक बचावले. अपघातातील दुचाकी चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला.

तप्त तापमानात वाहनांना आग लागण्याचा मोठा धोका

तप्त वातावरणात वाहनांना आग लागण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. अपघातानंतर खासगी बसला आग लागल्याची मोठी दुर्घटना घडली. या अगोदर धगधगत्या आगीमध्ये दोन चारचाकी वाहने भस्मसात झाल्याची धक्कादायक घटना शहरातील वाशीम बायपास मार्गावर एका गॅरेजसमोर सोमवारी सकाळी घडली होती. विद्युत रोहित्राखाली चारचाकी वाहन उभे होते. त्या चारचाकी वाहनाला अचानक आग लागली.

आग झपाट्याने पसरत गेली. बाजूलाच उभ्या दुसऱ्या वाहनाने देखील पेट घेतला. विद्युत रोहित्रांना आग लागून तारा देखील जळू लागल्या होत्या. दुसऱ्या एका घटनेमध्ये उमरी भागामध्ये एका दुचाकी वाहनाला देखील आग लागली होती. जिल्ह्यात तापमानाचा चढता आलेख कायमच आहे. अंगाची लाहीलाही होत असून घामाच्या धारा लागत आहेत. जिल्ह्यात वाढलेल्या तापमानाचा फटका आता वाहनांना बसत आहे.

आगीच्या भक्ष्यस्थानी वाहने सापडत आहेत. उन्हाची तीव्रता लक्षात घेता आता वाहनांची देखील विशेष काळजी घेण्याची गरज आहे. तापमानामुळे आगीच्या घटना सातत्याने वाढत आहेत. हे अत्यंत धोक्याचे ठरू शकते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close