क्राइम

पतीने पत्नीच्या गुप्तांगावर टाकले ऍसिड

Spread the love
 १५ दिवस उपचाराविना घरात डांबून ठेवले

उरळी कांचन / विशेष प्रतिनिधी

                  उरळी कांचन येथून एक मन हेलावणारी आणि कठोर हृदयं आणि नीच मानसिकतेच्या पतीची घटना समोर आली आहे. फक्त मुलीच होतात मुलगा होत नाही म्हणून एका पतीने आपल्या २४ वर्षीय पत्नीच्या गुप्तांगावर ऍसिड टाकल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. त्याचे यावरच समाधान झाले नाही तर त्याने तिला १५ दिवस उपचारा विना घरात कोंबून ठेवले.

मिळालेल्या माहितीनुसार, २४ वर्षीय पीडित महिलेचा विवाह काही वर्षांपूर्वी झाला होता. लग्नानंतर तिला मुली झाल्याने पती आणि सासरच्या लोकांकडून तिला सातत्याने टोमणे मारले जात होते. तुला फक्त मुलीच होतात, वंशाचा दिवा (मुलगा) होत नाही यावरून त्यांच्या घरात सतत वाद होत होते. पीडित महिला कुटुंबाला हातभार लावण्यासाठी कामावर जात होती. मात्र पती तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता.

२० एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास आरोपी पती दारूच्या नशेत धुंद होऊन घरी आला. त्याने घरात येताच पत्नीशी वाद घालण्यास सुरुवात केली. तू कामावर जातेस, तुझे बाहेर कोणाशी अनैतिक संबंध आहेत ते मला सांग, असे म्हणत त्याने तिला अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. पीडितेने याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने तिला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

या मारहाणीदरम्यान तिच्या पतीने विकृतीची सीमा ओलांडली. तुला आता जिवंतच सोडत नाही, अशी धमकी दिली. त्यानंतर त्याने घरात ठेवलेली ॲसिडची बाटली आणली. पीडितेने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु आरोपीने तिला जबरदस्तीने पकडून तिच्या गुप्तांगावर ॲसिड ओतले. ॲसिड पडल्यामुळे पीडित महिला वेदनेने विव्हळत जीवाच्या आकांताने ओरडू लागली. अंगाची तीव्र आग होत असल्याने तिने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी घराबाहेर पळून जाण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, त्या क्रूर नराधमाने मुख्य दरवाजा बाहेरून बंद केला. त्यानंतर तिला पुन्हा घरातून जबर मारहाण केली.

प्रकृती चिंताजनक

अंगावर शहारे आणणारी बाब म्हणजे, ॲसिडमुळे पीडितेचा गुप्तांगाचा भाग गंभीररीत्या भाजला होता. ती असह्य वेदनेने रडत होती. मात्र आरोपी पतीला तिची दया आली नाही. हा प्रकार कोणास समजू नये आणि पोलिसांत तक्रार होऊ नये, यासाठी त्याने पीडितेला कोणत्याही रुग्णालयात नेले नाही. तिला साधे प्रथमोपचारही न देता, तब्बल १५ दिवस खोलीत डांबून ठेवले. योग्य उपचारांभावी पीडितेच्या जखमा चिघळत गेल्या. तिची प्रकृती अत्यंत खालावली.

पोलिसांत गुन्हा दाखल, आरोपी जेरबंद

यानंतर अखेर १५ दिवसांनंतर पीडितेने कशीबशी सासरच्यांच्या तावडीतून सुटका करून घेतली. तिने आपल्या माहेरच्या लोकांशी संपर्क साधला. माहेरच्या लोकांनी तातडीने उरुळी कांचन गाठून पीडितेला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध खुनाचा प्रयत्न, घरगुती हिंसाचार आणि ॲसिड हल्ल्याच्या विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तत्परता दाखवत नराधम पतीला बेड्या ठोकल्या. यानंतर न्यायालयीन कोठडीत त्याची कसून चौकशी सुरू आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close