राजकिय

खासदार निलेश लंकेच्या विजयामध्ये पारनेरच्या शिवसैनिकांचा सिंहाचा वाटा . शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे

Spread the love

 

पारनेर [ श्री सुरेश खोसे पाटील यांजकडून ] – पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाची जागा हक्काने महाविकासआघाडीमध्ये शिवसेनेला ठेवणार , त्यामुळे शिवसैनिकां नी कामाला लागावे , असा आदेश शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे यांनी दिला आहे .
लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान पारनेर तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. परंतु आपण जुन्या नव्या सैनिकांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला, हे मोठं काम आपण सर्वांनी केलं ही हिम्मत आपण दाखवली, याचं कौतुक केलं पाहिजे, त्यामुळेच लोकसभेच्या निकालामध्ये खासदार निलेश लंके यांच्या विजयात पारनेर तालुक्यातील शिवसैनिकांचा सिंहाचा वाटा असल्याचे मत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी व्यक्त केले. शिवसेनेच्या भगवा सप्ताहनिमित्त आयोजित भव्य मशाल यात्रेच्या शुभारंभप्रसंगी टाकळी ढोकेश्वर येथील कार्यक्रमाप्रसंगी गाडे यांनी बोलताना पारनेरचे शिवसेना तालुकाप्रमुख डॉ.श्रीकांत पठारे यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. डॉ.श्रीकांत पठारे हे पारनेर तालुक्याचे भूषण असून लोकसभा निवडणुकीत डॉ.श्रीकांत पठारे यांच्या कामाची व संघटनकौशल्याची चुणूक पक्ष श्रेष्ठींच्या लक्षात आलेली असून पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाची जागा हक्काने महाविकासआघाडीमध्ये शिवसेनेला ठेवणार असल्याचे सुचक विधान जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी केले.
शिवसेना पक्षाच्या वतीने संपूर्ण राज्यभरात भगवा सप्ताह आयोजित करण्यात येत आहे. यानिमित्ताने पारनेर तालुक्यात मशाल यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांच्यासोबत उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले, तालुकाप्रमुख डॉ.श्रीकांत पठारे, युवा सेना तालुका प्रमुख अनिलराव शेटे, महिला आघाडी प्रमुख प्रियंका खिलारी, शेतकरी आघाडी तालुकाप्रमुख गुलाबराव नवले, जेष्ठ नेते डॉ.भास्कर शिरोळे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक किसन सुपेकर, बाबाजी तनपुरे , संतोष साबळे, संतोष येवले, सखाराम उजागरे सर, बाबा रेपाळे, सरपंच रामदास खोसे, सुनिता मुळे, देवराम मगर, धनंजय निमसे, दिपक मावळे, नितीन आहेर, अनिकेत देशमाने, अक्षय गोरडे, शुभम गोरडे, सुयोग टेकुडे, तानाजी मुळे, मोहन पवार, मुकेश गवळी, डॉ.नीता पठारे, मंगल पठारे, राजू बोरूडे, अक्षय दुश्मन, अशोक बोरुडे, स्वप्नील पुजारी, प्रशांत निंबाळकर, विशाल पठारे, गोरख पठारे, मंगेश सालके, गंगाधर पठारे, श्याम पठारे, दत्ता टोनगे, महेंद्र पांढरकर, ऋषिकेश नरसाळे, दिपक सुपेकर, अशोक सालके, कानिफनाथ पठारे, रामेश्वर ठाणगे, अशोक भोसले, नितीन पठारे, पप्पू रोकडे, मोहित जाधव, ऋषिकेश माने, प्रदीप चौधरी, राहुल मोरे, अशोक चौधरी, अभिजीत पवार यांच्या सह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थिती होते.
डॉ.श्रीकांत पठारे यांनी भगवा सप्ताह व मशाल यात्रेबाबत माहिती समजावून सांगत संपूर्ण ताकदीने पारनेर तालुक्यात सर्व शिवसैनिक जोमाने उध्दव ठाकरे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री करण्यासाठी मशाल यात्रेच्या माध्यमातुन जोमाने प्रचार करणार असल्याचे सांगितले .तसेच तालुक्यातील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले.
पारनेर तालुक्यातून डॉ.श्रीकांत पठारे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने मोठे शक्ती प्रदर्शन करत या भगव्या सप्ताहाला सुरुवात केली आहे. हा भगवा सप्ताह व मशाल यात्रा म्हणजे शिवसेना पक्षाची विधानसभेची तयारी समजली जात असून या माध्यमातुन शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाने प्रचाराचे रणशिंग फुंकले असल्याचे बोलले जात आहे.

[ चौकट –
पारनेरमध्ये शिवसैनिक लागले विधानसभेच्या तयारीला –
पारनेर तालुका हा शिवसेनेला मानणारा मतदार संघ आहे , या मतदार संघामध्ये शिवसेनेचं मोठं संघटन असून अनेक सर्वसामान्य शिवसैनिक हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या विचारांना मानून काम करतात. भगवा सप्ताह व मशाल यात्रेच्या माध्यमातून पारनेर मध्ये शिवसैनिक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी व पारनेर नगर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा आमदार करण्यासाठी व भगवा झेंडा पुन्हा फडकविण्यासाठी कामाला लागले आहेत. ]
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close