वरुड व्यापारी संघाचा पदग्रहण समारंभ संपन्न
गिरिधर देशमुख अध्यक्ष, अनिल हेटे सचिव, कार्याध्यक्षपदी रितेश शाह यांची वर्णी.
वरूड/तूषार अकर्ते
वरुड व्यापारी संघाच्या नव्या कार्यकारीची सभा गोमती जिनिंग अँन्ड प्रेसींग इंडस्ट्रीज येथे मावळते अध्यक्ष(ईमीजेट पास प्रेसीडेन्ट) डाँ.निळकंठ यावलकर यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाली आहे.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन वरुड नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रविण मानकर उपस्थित होते.पदग्रहण सभेत अध्यक्ष म्हणुन गिरिधर देशमुख तर सचिव म्हणुन अनिल हेटे, कार्याध्यक्ष म्हणुन रितेश शाह, उपाध्यक्ष म्हणुन धर्मेश जोशी व रमेश हुकुम, सहसचिव राजीव गावंडे, कोषाध्यक्ष जगदिश उपाध्याय सहकोषाध्यक्ष राहुल पटेल, पी.आर ओ.म्हणुन यशपाल जॆन यांनी पदभार सांभाळला यावेळी प्रशासक प्रविण मानकर यांनी आपल्या भाषणातुन व्यापारी बांधवाच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. कार्याध्यक्ष रितेश शाह यांनी आपल्या भाषणातुन सर्व सदस्यांनी सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमात मावळते सचिव व उपाध्यक्ष धर्मेश जोशी , दत्ता शिंदे, अशोक देवते, रमेश हुकुम, डाँ.रवि यावलकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी नव्याने आयोजित करण्यात आलेल्या कार्यकारणीच्या सभेत जेष्ठ सदस्य सुधाकर ठाकरे, भास्कर चोखट, विनोद धरमठोक, सुरेन्द्र चांडक, कन्नु पटेल, अशोक वानखडे, जेठानंद बाशाणी, प्रविण धरमठोक, प्रविण डाफे, राहुल पटेल, जितेन शाह कल्याण कोटेचा, विनोद धरमठोक, आशिष रडके उपस्थित होते. कार्यक्रमात नवे अध्यक्ष गिरिधर देशमुख व सचिव अनिल हेटे यांनी संघाच्या हितासाठी सदॆव प्रयत्नरत राहु असे आश्वासन दिले.
यावेळी बहुतांश सदस्य सपत्निक आले होते कार्यक्रमासाठी गोमती जिनिंग अँड प्रेसिंग इंडस्ट्रीजच्या डायरेक्टर अनुराधा शाह, वरुड व्यापारी संघाचे कार्याध्यक्ष रितेश शाह व हर्ष शाह यांनी छान आयोजन करुन प्रमुख पाहुण्यांचे व सर्व सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी वरुड व्यापारी संघाचे सहसचिव राजीव गावंडे तसेच सदस्य आशिष रडके यांचा वाढदिवस मंगलमय वातावरणात वेदमंञाच्या जयघोषात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे संचालन पी. आर.ओ.यशपाल जैन यांनी तर प्रास्ताविक सचिव अनिल हेटे यांनी केले. आभार प्रदर्शन डाँ.रवि यावलकर यांनी केले.