वाचनालयात जुळले सुत, मानगुटीवर बसले प्रेमाचे भूत

विवाहित पुरुषाने प्रेयसी सोबत मिळून केली पत्नीची हत्या
गांधीनगर / विशेष प्रतिनिधि
चार मुलांचा बाप आणि पाचवा मुलगा पत्नीच्या पोटात असलेला रोहित रमेश ठाकोर हा स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी वाचनालयात जात होता. येथे त्याचे वाचनालयात येणाऱ्या वर्षा नरसिंह पारगी या महिलेसोबत जुळले. यानंतर रोहित पत्नीला सोडून महिलेसोबत लिव्ह इन मध्ये राहू लागला. घटनेच्या दिवशी रोहित च्या पत्नीने त्याला महिलेशी मोबाईल वर बोलतांना पकडले. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. त्यात पतीने प्रेयसीच्या मदतीने पत्नीची रुमालाने गळा आवळून हत्या केली.
आरोपी रोहित आधीच तीन मुली आणि एक मुलगा होता. संगीता पुन्हा गर्भवती राहिल्यानंतर आरोपीला तिचा गर्भपात करायचा होता, पण संगीताने गर्भपात करण्यास स्पष्ट नकार दिला. यावरून दोघांमध्ये सतत खटके उडत होते. याच वादातून आरोपी आणि त्याच्या प्रेयसीने संगीताचा काटा काढण्याचा कट रचला. गुरुवारी आरोपीने रुमालाने गळा आवळून गर्भवती संगीताची हत्या केली.
औषधाच्या रिएक्शनचा बनाव
हत्येनंतर आरोपीने संगीताचा मृत्यू औषधाच्या रिॲक्शनमुळे किंवा चुकीच्या औषधोपचाराने झाल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला. गुरुवारी पहाटे ६ वाजता संगीताच्या सासऱ्यांनी तिच्या चुलत भावाला फोन करून ती गंभीर आजारी असून तिला गांधीनगर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याचे सांगितले.
संगीताचा चुलत भाऊ आणि इतर नातेवाईक सकाळी ११ वाजता रुग्णालयात पोहोचले, तेव्हा संगीताचा मृत्यू झाल्याचे त्यांना समजले. मृतदेह पाहिल्यानंतर नातेवाईकांना तिच्या गळ्यावर वळ आणि खुणा दिसल्या, ज्यामुळे संशय बळावला. यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गळ्यावरील खुणांमुळे हा प्रकार आत्महत्येचा नसून हत्येचा असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतले असून चौकशीदरम्यान त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे.




