क्राइम

पत्नीची दगडा ने ठेचून हत्या चारित्र्यावर होता संशय

Spread the love

 

चार वर्षाच्या मुलासमोर पत्नीला केले ठार

धाराशिव / विशेष प्रतिनिधी

उच्चशिक्षित असलेल्या बेरोजगार तरुणाने बायकोच्या चारित्र्यावर संशय घेत तिची दगडाने ठेचून हत्या केली आहे. यानंतर तो पसार झाला आहे. या निर्दयी पतीने चार वर्षाच्या मुलाच्या डोळ्यादेखत बायकोला ठार केले आहे.घटना धाराशिव जिल्ह्यात घडली आहे.

या प्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी पती फरार आहे. आरोपी पतीने पत्नीची दगडाने ठेचून हत्या केली.

गणेश शिवाजी टेकाळे असे आरोपी पतीचे नाव असून तो पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. याच संशयातून त्याने काही दिवसांपूर्वी पत्नीचा मोबाईलवरून एक व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. या व्हिडिओमध्ये कथित अनैतिक संबंधांबद्दल बळजबरीने कबूलनामा करून घेण्यात आला होता आणि ही क्लिप काही नातेवाईकांनाही पाठवण्यात आली होती.

बुधवारी दुपारी अडीच ते तीनच्या सुमारास पती-पत्नीमध्ये जोरदार भांडण झाले. त्यानंतर संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास गणेशने पत्नीला दुचाकीवर बसवले आणि कळंब-येरमाळा मार्गावरील हासेगाव परिसरातील एका निर्जन ज्वारीच्या शेतात नेले. तिथे पुन्हा वाद झाल्यानंतर आरोपीने कोमलला बेदम मारहाण केली आणि शेवटी डोक्यात दगड घालून तिची हत्या केली.

मुलाच्या डोळ्यांसमोर थरार

ज्या वेळी हा थरार सुरू होता, त्यावेळी त्यांचा चार वर्षांचा लहान मुलगा तिथेच होता. मुलाच्या डोळ्यांसमोरच त्याच्या आईचा खून झाला. आईचा खून झाल्यानंतर मुलाने पोलिसांना घटनास्थळी नेऊन मृतदेह असलेली जागा दाखवली.

व्हॉट्सॲप स्टेटस आणि व्हिडिओ

आरोपी गणेशने हत्येदरम्यान मोबाईलमधून व्हिडिओ रेकॉर्डिंगही केल्याची माहिती समोर आली आहे. हत्या केल्यानंतर आरोपीने स्वतःच्या मोबाईलवर व्हॉट्सॲप स्टेटस ठेवले होते, ज्यावर तिने मला धोका दिला, तिला मी शिक्षा दिली,” असा मेसेज लिहिला होता. या स्टेटसमुळे या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे.

आरोपीचा शोध सुरु

गणेश टेकाळे हा उच्चशिक्षितअसून सध्या बेरोजगार होता. गेल्या काही दिवसांपासून तो व्यसनाच्या आहारी गेल्याची माहितीही समोर आली आहे. आरोपी पती घटनेनंतर लगेच फरार झाला असून, पोलिसांची पथके त्याचा कसून शोध घेत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close