ब्रेकिंग न्यूज

सापण धरणात चिचखेडा येथील विवाहित जोडप्याचे मिळाले मृतदेह !

Spread the love

परतवाडा/ संतोष भालेराव
अचलपूर तालुक्यातील वझ्झर गावानजीक असणा-या सापन धरणात आज १८ मे रोजी सकाळी ६-३० ते ७ वा सुमारास या धरणाच्या पाण्यात दोन मृतदेह तरंगताना दिसून आले या घटनेची माहिती परतवाडा पोलीसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले
पोलीसांनी तरंगणारे दोन्ही मृतदेह सुरमा भोपाली यांच्या सहकार्याने बाहेर काढून अंत्यंत बारकाईने घटनास्थळी पाहणी केली असता तेथुन जवळच एक दुचाकी आढळून आली अनोळखी मृतदेहा बाबतीत चौकशी सुरू केली असता चिचखेडा या चिखलदरा तालुक्यातील गावातील हे रहिवासी होते असे पोलिसांचे निदर्शनास आले
मृतक विक्की मंगलदास बारवे (२४) व तुलसी विक्की बारवे अशी दोन्ही मृतांची ओळख पटल्याचे पोलीसांनी माहिती दिली
दोन्ही मृतदेह उप जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे परतवाडा पोलिस पुढील तपास करीत आहेत
*सापण धरण ठरत आहे सुसाईट* *पाॅईंट*
सापण धरण परिसरात अनेक हौशी लोक फेरफटका मारण्यासाठी जात असतात
या धरणक्षेत्रात पती पत्नी चा मृतदेह आढळुन आल्याने अनेक शंका कुशंका जन्म घेत आहेत
कारणं कि यापूर्वी सुद्धा दोन मुलींनी याचं धरणात आत्महत्या केल्याचे ऐकिवात आहे
संबंधित जलसंपदा विभागाच्या अधिकारी यांनी याबाबत त्वरित उपाययोजना करण्याची गरज आहे नाही तर सापण धरण हे सुसाईट पाॅईंट म्हणून फेमस होईल

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Check Also
Close
Back to top button
Close
Close