सिद्धेश्वर श्री संत गुलाब बाबा आश्रम संस्थेचे अध्यक्ष स्व.श्री. ज्ञानेश्वरराव उमक यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
अंजनगाव सुर्जी:-(मनोहर मुरकुटे)दि.५
सिद्धेश्वर श्री संत गुलाब बाबा आश्रम संस्था टाकरखेडा मोरे चे अध्यक्ष स्व.श्री. ज्ञानेश्वरराव रामरावजी उमक यांची बुधवार दिनांक ०५ जुलै २०२३ ला सकाळी ०६:०० वाजता वयाच्या ६७ व्या वर्षी हृदविकाराच्या तीव्र झटक्याने प्राणज्योत मावळली.उमक कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.स्व.ज्ञानेश्वरराव उमक हे श्री संत गुलाबबाबा आश्रम संस्थेचे निरंतर ३८ वर्ष अध्यक्ष होते.त्यांचे पार्थिव श्री संत गुलाब बाबा आश्रम समाधी मंदिर येथे आज गुरुवार दि. ०६ जुलै २०२३ रोजी सकाळी ०८:०० ते १०:३२ पर्यंत अंत्यदर्शनाकरिता ठेवण्यात येणार असून भाविकांना अंत्यदर्शनासाठी त्रास होणार नाही याकरिता आश्रम संस्थेच्या पदाधिकारी यांचे कडून काळजी घेण्यात आली आहे.
त्यांचे पश्चात आई लिलाबाई,पत्नी कोकिळाबाई,मुलगा गोपाल,सून अमृता,मुली सौ.प्रियंका राहुल गणगणे (वडाळी),सौ निकिता अमर रोही,पांढरी ,नातु श्रीनिश असा आप्त परिवार आहे.
गुलाबबाबा यांचे काटेल, नागपूर,सागर मध्यप्रदेश, ओंघोल आंध्रप्रदेश,कर्नाटक मध्ये लखन गाव व मुंबई येथे आश्रम आहेत.
सिद्धेश्वर श्री संत गुलाबबाबा आश्रमात समाधी मंदीर येथे पार्थिव ला १०. ३२ वाजता आश्रमाच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ज्ञानेश्वरराव उमक यांच्या मृत्यू ची बातमी कळताच समाधी मंदिर ट्रस्ट व भाविक भक्त तथा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.