हटके

रील बनवण्यासाठी तरुणीने केला पोलीस वाहनाचा वापर अधिकाऱ्यावर कारवाईचा बडगा

Spread the love

जालंधर (पंजाब)/ नवप्रहार मीडिया 

                    सध्या सोशल मीडियावर मग ते व्हाट्सअप असो, फेसबुक असो अथवा इन्स्टाग्राम रील बनवून टाकण्यास अनेक लोकं उत्साहित असतात. युट्युबर  इन्स्टाग्राम इन्फ्लुअन्सर हे तर काही तरी नवीन करण्याचा शोधात असतात. आपल्या सरकारी वाहनावर एका इन्स्टाग्राम इन्फ्लुअन्सर ला रील बनवू देणे एका पोलीस अधिकाऱ्याला चांगलेच महागात पडले आहे. वरिष्ठांनी त्याला निलंबित केले आहे.

गेल्या काही दिवसांत इन्स्टाग्राममुळे इन्फ्लुअन्सर्सची संख्या वाढली आहे. अनेकजण विविध कलेच्या माध्यमातून इन्स्टाग्रामवरून व्यक्त होत असतात. तर काही इन्फ्लुअन्सर्स समाजात चुकीचे संदेशही पसरवतात. असाच प्रकार पंजाबच्या जालंधर येथे घडला आहे. एका तरुण इन्स्टाग्राम इन्फ्लुअन्सरने पोलिसांच्या वाहनात बसून रील शूट केले. या रीलमध्ये तिने अश्लिल आणि विचित्र हावभाव केले आहेत. तसंच, ती गाडीच्या बोनेटवरही बसली. धक्कादायक म्हणजे, पोलीस अधिकाऱ्यानेच तिला पोलीस वाहनाचा वापर करण्याची परवानगी दिली होती.

तिचा हा रील सोशल मीडियावर व्हायरल होताच जालंधरचे पोलीस आयुक्त कुलदीप चहल यांनी अशोक शर्मा या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई केली. सोशल मीडियासाठी रिल्स बनवण्याकरता मुलीला पोलिसांच्या अधिकृत वाहनाचा वापर करू दिल्याबद्दल संबंधित पोलीस अधिकाऱ्याचं निलंबन करण्यात आलं.

ऑगस्टमध्येही पंजाबमध्ये असा प्रकार घडला होता. एका इन्फ्लुअन्सरने थारवर बसून होशियारपूरमधील राष्ट्रीय महामार्गावर फेरफटका मारून तिचे दहा लाख फॉलोवर्सचे यश सेलिब्रेट केले होते. याप्रकरणीही पोलिसांचं निलंबन करण्यात आलं होतं.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close