क्राइम
बोरगाव निस्ताने घाटात गोळीबार !

नवप्रहार ची शंका खरी ठरली
बोरगाव निस्ताने घाटात गोळीबार !
मतदार संघाचा होतोय बिहार या मथळ्याखाली नवप्रहार ने प्रसिद्ध केली होती बातमी
शासन आणि प्रशासन आरोपीच्या पिंजऱ्यात ?
तहसीलदार यांच्या कॉल डीटेल्स ची चौकशी होणे आवश्यक
एसपी विशाल आनंद कडून निष्पक्ष आणि कायदेशीर कारवाईची जनतेला अपेक्षा
धामणगाव रेल्वे / विशेष प्रतिनिधी
धामणगाव रेल्वे तालुक्यातील बोरगाव निस्ताने घाटात काल रात्री दरम्यान गोळीबार झाल्याने परिसरात दहशत पसरली आहे. नवप्रहार ने मतदार संघाचा बिहार होतोय का ? या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध करत आधीच शंका वर्तविली होती.ती शंका आता खरी ठरली आहे. या घटनेनंतर शासन आणि प्रशासन आरोपीच्या पिंजऱ्यात उभे ठाकले आहेत. तर या प्रकरणांत तहसीलदार अभय घोरपडे यांच्या कॉल डीटेल्स ची चौकशी होणे अतिशय आवश्यक असल्याचे बुद्धिजीवी वर्गाचे म्हणणे आहे.
घाट लिलावात घेतला असला तरी उत्खनन बेकायदेशीर – सदर चा घाट मुन्ना याने शासकीय नियमानुसार लिलावात घेतला असला तरी या ठिकाणी बेकायदेशीर आणि नियमबाह्य उत्खनन करण्यात येत असल्याची चर्चा पंचक्रोशीत होत आहे. त्यामुळे या ठिकाणी जुन्या नवीन वाळू माफियांची कडक नजर होती. घाट चालक बेकायदेशीर कृत्य करत असल्याने आम्हाला सुद्धा त्यात सहभागी करुन घ्यावे अशी अनेकांची रास्त अपेक्षा आहे.
महसूल प्रशासन खिशात असल्याने घाट चालकाला माज – सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार घाट चालक मुन्ना आणि त्याचे लोकल सहकारी नेहमीच तोऱ्यात वावरत असून महसूल प्रशासन आमच्या खिशात असल्याच्या वल्गना करतात. आणि तक्रारी नंतर देखील कारवाई होत नसल्याने त्याच्या म्हणण्यात दम आहे असे सिद्ध होत आहे. त्यामुळे महसूल प्रशासन घाट चालक आणि त्याच्या लोकल चिल्ल्यापिल्यांच्या दावणीला बांधले असल्याचे चित्र दिसत आहे.
शासन आणि प्रशासन आरोपीच्या पिंजऱ्यात – कुठलेही काम हे नियमांतर्गत व्हावे याची जबाबदारी शासन आणि प्रशासनाची असते. पण या ठिकाणी लागोपाठ झालेल्या दोन घटनेनंतर शासन आणि प्रशासनाकडून कुठलेही पाऊल उचलल्या न गेल्याने गोळीबाराच्या या घटनेनंतर शासन आणि प्रशासन आरोपीच्या पिंजऱ्यात उभे झाले आहेत.
तहसीलदार यांच्या कॉल डीटेल्स ची चौकशी होणे अत्यावश्यक – बुद्धिजीवी वर्गात सुरू असलेल्या चर्चे नुसार धामणगाव रेल्वे तहसीलदार पदावर जेव्हापासून अभय घोरपडे रुजू झाले आहेत. तेव्ह पासून तहसील मध्ये अवैध वाळू आणि मुरूम उत्खनन , अवैध विटा पाजाळे यात बऱ्याच मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आणि यासाठी तहसीलदार अभय घोरपडे जबाबदार असल्याचे जनतेचे म्हणणे आहे. घोरपडे हे वाळू आणि मुरूम माफिया यांच्याशी नेहमी संपर्कात असतात असे जनतेचे म्हणणे आहे त्याचे कॉल डिटेल्स काढल्यास दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊ शकते असे जनतेचे म्हणणे आहे.
एसपी विशाल आनंद यांच्या कडून जनतेला कारवाईची अपेक्षा – एसपी विशाल आनंद यांच्या कार्यकाळात एलसीबी ला कथित रित्या विशेष अधिकार मिळाल्याने जिल्ह्यात सगळीकडे अवैध व्यवसाय फोफावले आहेत असे बुद्धिजीवी लोकांचे म्हणणे आहे. आणि अवैध व्यावसायिकांना कथित रित्या एलसीबी चे वरदहस्त असल्याने अवैध व्यावसायिक बेलगाम झाले आहेत. त्यामुळे सामान्य जनतेचा पोलिस प्रशासनावरून हळूहळू विश्वास कमी होत चालला आहे. या प्रकरणात एसपी विशाल आनंद यांनी योग्य ती कायदेशीर आणि निष्पक्ष कारवाई करावी अशी जनतेची मागणी आहे. ( क्रमशः)




