ग्राम रोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांवर सुनील राणांसोबत सकारात्मक चर्चा

राहुल कारकोन यांच्या नेतृत्वात मानधनासह विविध मागण्यांवर चर्चा; पाठिंब्याचे आश्वासन
अमरावती : प्रतिनिधी दि.९
ग्राम रोजगार सहाय्यकांच्या विविध समस्या, अडीअडचणी, प्रलंबित मानधन तसेच दि. २२ सप्टेंबर २०२६ चा अन्यायकारक शासन निर्णय रद्द करण्याच्या मागणीसंदर्भात ग्राम रोजगार सहाय्यक संघटना, तालुका अमरावतीच्या वतीने अध्यक्ष राहुल कारकोन यांच्या नेतृत्वाखाली दि. ८ ऑक्टोबर २०२६ रोजी युवा स्वाभिमान पक्षाचे मार्गदर्शक सुनील राणा यांच्याशी सकारात्मक चर्चा करण्यात आली.
यावेळी ग्राम रोजगार सहाय्यकांना भेडसावणाऱ्या विविध अडचणी, मानधनाचा प्रश्न आणि शासन निर्णयामुळे निर्माण झालेल्या समस्यांकडे लक्ष वेधण्यात आले. ग्राम रोजगार सहाय्यकांच्या न्याय्य मागण्यांची सोडवणूक व्हावी, तसेच त्यांच्या अडचणी दूर व्हाव्यात, यासाठी संघटनेच्या वतीने विविध मुद्दे मांडण्यात आले.
या चर्चेदरम्यान सुनील राणा यांनी ग्राम रोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांवर सकारात्मक भूमिका घेत प्रत्येक विकासकामात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे ग्राम रोजगार सहाय्यकांच्या प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने या चर्चेला महत्त्व प्राप्त झाले आहे.




