क्राइम

तरुणीचे अपहरण करत तिला दरीत ढकलून दिले 

Spread the love

कोल्हापूर / विशेष प्रतिनिधी

               कथित प्रेयसी चे लग्न अन्य तरुणासोबत ठरल्याचे समजताच तरुणाने तिचे अपहरण करत तिला दरीत ढकलून दिल्याचा संतापजनक आणि घृणास्पद प्रकार समोर आला आहे. घटना कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील शिवडाव नाईकवाडी परिसरात घडली आहे.

यामध्ये तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. तरुणी इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होती. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत नराधम प्रियकर श्रीपाद वडर याला बेड्या ठोकल्या आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृत तरुणी आणि संशयित आरोपी श्रीपाद वडर यांचे प्रेमसंबंध होते. मात्र, काही दिवसांपूर्वी तरुणीचे लग्न तिच्या घरच्यांनी ठरवले होते. आता आपले प्रेमसंबंध तुटणार आणि ती दुसऱ्याशी विवाह करणार या रागातून श्रीपादच्या मनात प्रचंड संताप निर्माण झाला होता. याच रागातून त्याने तिच्या हत्येचा कट रचल्याची माहिती समोर आली आहे.

तरुणीते अपहरण केलं आणि दरीत ढकलले

ठरलेल्या प्लाननुसार, श्रीपादने संधी साधून तरुणीचे अपहरण केले. त्यानंतर तिला भुदरगड तालुक्यातील शिवडाव नाईकवाडी परिसरातील एका निर्जन भागात नेले. तिथे दोघांमध्ये वाद झाल्यानंतर आरोपीने तिला खोल दरीत ढकलून दिले. खोल दरीत कोसळल्यामुळे तरुणीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा जागेवर मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

तरुणाला तात्काळ अटक

घटनेची माहिती मिळताच भुदरगड पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शविच्छेदनासाठी पाठवला. याप्रकरणी कसून चौकशी सुरू केली असता, संशयित प्रियकर श्रीपाद वडर याने चौकशी दरम्यान गुन्ह्याची कबुली दिली आहे. भुदरगड पोलिसांनी आरोपी श्रीपाद वडर याला तात्काळ अटक केली असून, त्याच्यावर हत्येचा व अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. एका होतकरू तरुण अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीचा अशा प्रकारे घात झाल्यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close