लुटारूंची अशीही दारियादिली

दाम्पत्याला लुटण्यासाठी आलेल्या दोघांनी त्यांच्या हातात ठेवले 100 रु.
ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.
नवी दिल्ली / नवप्रहार न्यूज नेटवर्क
कधी कधी अश्याया विचित्र घटना घडतात की प्रथम त्यावर विश्वास बसत नाही. नंतर हसू आवरत नाही असाच प्रकार राजधानी शाहदरा परिसरात घडली आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.
या विचित्र घटनेबद्दल अधिक माहिती अशी की शाहदरा परिसरातून एक दाम्पत्य आपल्या स्कुटीवरून जात असताना दोघे त्यांना अडवतात. ते दाम्पत्याला पिस्तुल दाखवून महिलेच्या अंगावरील दागिने काढण्यास सांगतात. महिला अंगावरील सर्व दागिने काढून देते. पण ते दागिने नकली आल्याचे समजल्यावर ते तिला दागिने परत करतात नंतर ते पुरुषाचे खिसे तपासतात. पुरुषाच्या खिशात त्यांना 20 रु सापडतात. मग ते त्यांना 100 रु देऊन निघून जातात.
राजधानी दिल्लीतील शाहदरा परिसरातून दरोड्याची एक विचित्र घटना समोर आली आहे. स्कूटीवरील जोडप्याला लुटण्यासाठी दोन दरोडेखोर पिस्तूल दाखवतात. प्रथम त्यांनी महिलेला दागिने काढण्यास सांगितले, नंतर ते खोटे असल्याचे पाहून त्यांनी महिलेसह त्या व्यक्तीची तपासणी केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. धमकी दिल्यानंतर दोघांना 20 रुपयांपेक्षा जास्त काही मिळाले नाही. यानंतर दाम्पत्याला 100 रुपये देऊन दरोडेखोर निघून जातात.
ही घटना 21 जूनच्या रात्रीची आहे. पोलिसांनी दोन्ही दरोडेखोरांना पकडले आहे. दोघांचीही ओळख पटली. एकाचे नाव हर्ष राजपूत आणि दुसरे नाव देव वर्मा. या घटनेच्या दिवशी दिल्ली पोलिसांना या भागात एकाच वेळी तीन कॉल आले. ज्यामध्ये पोलिसांना एका ठिकाणी पिस्तुल दाखवून मोबाईल लुटण्याचा आणि अन्य ठिकाणी दागिने हिसकावण्याचा फोन आला.
डीसीपी शाहदरा रोहित मीना यांनी सांगितले की, 21 जून रोजी संध्याकाळी पोलिसांना तीन घटनांची माहिती मिळाली. दाम्पत्याकडून दागिने हिसकावण्याचा पहिला कॉल, दुसरा मोबाइल हिसकावल्याचा तिसरा पिस्तुल दाखवण्याचा कॉल आला. हे सर्व कॉल्स एकाच भागातील होते. त्यानंतर पोलीस पथक सक्रिय झाले. संपूर्ण परिसरातील 200 सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले.
रोहित मीना यांनी सांगितले की, दरोडेखोर दारूच्या नशेत होते. मुलीचे दागिने खोटे होते, मग तिला सोडून तिचा पार्टनरला चेक करतो, त्याला फक्त 20 रुपये मिळतात. तेथून 100 रुपये देऊन हल्लेखोर निघून जातात. यामध्ये एक आरोपी हर्ष राजपूत मोबाईल शॉपीवर काम करतो, तर दुसरा देव वर्मा नीरज बवानिया टोळीचा प्रभाव आहे. पिस्तूल, स्कूटी, मोबाईल जप्त करण्यात आला असून चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.