पती आणि सुनेला नको त्या अवस्थेत पाहणाऱ्या पत्नीचा गेम खल्लास
अहिरोली (युपी)/ नवप्रहार डेस्क
पती आणि सुनेला बेडरूम मध्ये नको त्या अवस्थेत पाहिलेल्या आणि त्यातून झालेल्या वादात सासरा आजी सुनेने महिलेचा गेम खल्लास केल्याचा प्रकार उत्तरप्रदेश च्या कुशीनगर जिल्ह्यातील अहिरोली गावातून समोर आला आहे. सुरवातीला आरोपींनी पोलिसांची दिशाभूल केली. पण पोलिसांनी तिघांना वेगवेगळे बसवून विचारपूस केली असता खुनाचा हा प्रकार उघड झाला.
उत्तर प्रदेशातल्या कुशीनगर इथल्या जटहा बाजार पोलीस स्टेशन हद्दीतल्या अहिरोली गावात ही घटना घडली. तिथल्या एका घरातून गुरुवारपासून घुरहू यादवची पत्नी गीता देवी (वय 50) बेपत्ता होती. एक अनोळखी व्यक्ती बाइकवरून आली आणि सासू त्याच्यासोबत गाडीवर बसून गेली, असं तिची सून गुडियाने पती दीपकला सांगितलं. बराच वेळ झाला तरी गीतादेवी घरी न परतल्याने सर्वांची चिंता वाढली. नातेवाईक आणि गावात शोध घेऊनही ती सापडली नाही. मग घुरहू यादवने शुक्रवारी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करून सांगितलं, की माझी पत्नी गीतादेवी बेपत्ता आहे. बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करून कारवाई सुरू केली.
पोलीस तपासात शनिवारी सकाळी दरवाज्याजवळ असलेल्या शौचालयाच्या टाकीत बेपत्ता गीता देवीचा मृतदेह सापडला. टाकीचं झाकण उघडून मृतदेह बाहेर काढण्यात आला. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. डोक्याला मार लागल्याने महिलेचा मृत्यू झाल्याचं शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झालं.
या प्रकरणाच्या तपासासाठी एसपी संतोष मिश्रा यांनी एक पथक स्थापन केलं. सून, मृत महिलेचा मुलगा आणि पतीची वेगवेगळ्या वेळी चौकशी केली असता, त्यांच्या बोलण्यात सुसूत्रता नसल्याचं दिसलं. मग पोलिसांनी मंगळवारी कसून चौकशी केली असता मृत महिलेचा पती घुरहू आणि सून गुडियाने गुन्ह्याची माहिती दिली. गेल्या दोन वर्षांपासून आपलं अफेअर सुरू असल्याचं या दोघांनी पोलिसांना सांगितलं.
आठवडाभरापूर्वी गीता देवीने तिचा पती आणि सुनेला आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं होतं. ते शारीरिक संबंध ठेवत होते. गीता देवीने याला विरोध केला. यावरून त्यांच्यात वाद सुरू झाला. सून आणि सासऱ्याने सासूला मार्गातून हटवण्यासाठी एक कहाणी रचली. गुरुवारी संध्याकाळी गीता देवीच्या डोक्यावर अर्धवट जळालेलं लाकूड आणि विटेने वार केले. यात तिचा मृत्यू झाला. मग तिचा मृतदेह घरातल्या शौचालयाच्या पाण्याच्या टाकीत लपवला. पोलिसांना हत्येसाठी वापरलेलं अर्धवट जळलेलं लाकूड, विटेचा तुकडा, रक्ताने माखलेला लोकरीचा स्वेटर आणि सलवार सापडली. पोलिसांनी हे सर्व जप्त करून सासरा आणि सुनेची तुरुंगात रवानगी केली.