जगद्गुरु संत तुकाराम महाराज जयंती उत्साहात साजरी
बाळासाहेब नेरकर कडून
हिवरखेड :- छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांची जयंती स्थानिक चंडिका चौक येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
नम्र जाला भूतां l तेनें कोंडीले अनंता ll हेची शूरत्वाचे अंग l हारी आणिला श्रीरंग ll
जो सर्व प्राणीमात्राशी नम्रतेने वागतो त्याच्या हृदयात परमेश्वर नांदतो अशाप्रकारे श्रीरंगाला जिंकणे हेच खरे शूरत्व आहे अशे 4500 पेक्षा जास्त अभंग रचना करून वैचारिक क्रांती घडविणारे , त्या काळी शेतकऱ्यांना पहिली सरसकट कर्जमाफी देणारे पहिले संत, छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेसाठी प्रेरणा देणारे संत म्हणजे तुकाराम महाराज त्यांची जयंती संपूर्ण महाराष्ट्रावर साजरी केल्या जाते त्या अनुषंगाने हिवरखेड येथील स्थानिक चंडिका चौकात जगतगुरु संत तुकाराम महाराज यांची जयंती समाज प्रबोधन करून कुणबी युवा मंच च्या वतीने साजरी करण्यात आले या जयंती निमित्त हिवरखेड येथील सर्व जाती-धर्माच्या राजकीय व सामाजिक मंडळीला आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जगन्नाथ महाकाळ हे होते तर प्रमूख उपस्थितित शोएबअली मिरसाहेब, रमेश दुतोंडे,डॉ. प्रशांत इंगळे, अनिल कराळे, महेंद्र भोपळे, सुरेश गिरहें, राजुखान, दीपक रायबोले, संजय शेंडे, सुनील इंगळे, किरण सेदानी, प्रवीण येऊल, संदिप इंगळे यांच्यासह पत्रकार बांधवांसह शेकडो नागरिक उपस्तीत होते या कार्यक्रमाचे संचालन राजेश टाले सर,प्रास्ताविक महेन्द्र कराळे सर तर आभाप्रदर्शन परणाटे सर यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कुणबी युवा मंच चे विशाल परनाटे, प्रफुल पाचपोर, योगेश दूतोंडे, चेतन ढबाले, अक्षय मोरखडे, विनोद धबाले, नंदू शिंदपुरे, मनोज भगत, गणेश घावट, रोहित बहाकर, सौरभ ढबाले ,आकाश फोपसे ,प्रणव राऊत सुपेश राऊत, शुभम शिंगणे ,कुणाल ढबाले सागर दुतोंडे,मुन्ना नाठे, अनिल ताडे यांनी परिश्रम घेतले.