क्राइम

स्पा सेंटर च्या नावाखाली चालणाऱ्या हाय प्रॉफाईल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश 

Spread the love

पुणे / विशेष प्रतिनिधी 

                  स्पा ( मसाज सेंटर )च्या नावाखाली चालणाऱ्या हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट चा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. चार लोकांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. घटना औंध येथील मुरकुटे प्लाझा येथे घटना घडली आहे.

या छाप्यात युनिट चारच्या पथकाने महाराष्ट्रातील चार, गुजारातमधील एक आणि थायलंड देशातील चार महिलांची सुटका केली.

याप्रकरणी स्पा मालक, मॅनेजर, कॅशिअर तसेच मध्यस्थी करणार्‍यासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मध्यस्थी करणार्‍या रिकबुल हुसेन आबुल हुसेन (वय 26, रा. मुळ बेरबेरी रोड, आसाम) याला ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, चतुःश्रृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयानंद पाटील यांच्या सूचनेप्रमाणे सहायक निरीक्षक नरेंद्र पाटी, उपनिरीक्षक वैभव मगदुम यांच्या पथकाने ही कारवाई केली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close