जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत दिव्यांगाचा लढा असाच सुरू राहणार-गुरुदेव
▪️यवतमाळच्या ऐतिहासिक अशा आझाद मैदानवर 24 तारखेपासून दिव्यांग बांधव उपोषणासाठी बसलेले आहेत
▪️ गणतंत्र दिवसाच्या पूर्वसंध्येला दिव्यांग बांधव उपोषणास बसले
यवतमाळ: / प्रतिनिधी
यवतमाळमध्ये दिव्यांग बांधवांनी आपल्या न्याय्य हक्कांसाठी 24 जानेवारीपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. प्रशासनाकडून वारंवार आश्वासन दिले गेले, परंतु त्याची पूर्तता न झाल्यामुळे संतप्त दिव्यांग बांधवांनी गणतंत्र दिनाच्याच पार्श्वभूमीवर आपल्या आंदोलनाची धार अधिक तीव्र करण्याचा निर्धार केला आहे.
▪️प्रशासनाची आश्वासने आणि दिव्यांग बांधवांचा संघर्ष
मागील वर्षी जानेवारी महिन्यात झालेल्या सभेत दिव्यांग प्रतिनिधींना लेखी स्वरूपात आश्वासन देण्यात आले होते. मात्र वर्ष उलटूनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे या अन्यायाविरोधात दिव्यांग बांधवांनी पुन्हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.
▪️प्रमुख मागण्या:
रमाई आवास योजनेचा लाभ: दिव्यांगांना रमाई आवास योजनेअंतर्गत त्वरित घरे मिळावीत, प्रधानमंत्री आवास योजना: दिव्यांग आणि बेसहारा गटातील लाभार्थ्यांना प्राधान्य दिले जावे,अतिक्रमणग्रस्त दिव्यांगांसाठी घरे: ज्या दिव्यांग लाभार्थ्यांचा सर्वे झालेला नाही, त्यांना त्वरित लाभ द्यावा,विनाअट घरकुले: 2023-24 या वर्षात अर्ज करूनही वंचित राहिलेल्या दिव्यांगांना त्वरित घरे मिळावीत,सानुग्रह अनुदान: 275 रुपयांवरून 600 रुपये करण्यात यावे,स्वयंरोजगारासाठी मदत: शासकीय कार्यालयांमध्ये व्यवसाय उभारणीसाठी पाठबळ द्यावे,व्यवसायासाठी जागा: नगरपालिका नियमानुसार दिव्यांगांना 200 स्क्वेअर फुट जागा उपलब्ध करून द्यावी,दुकाने व गाळे उपलब्ध करून द्यावे: 2019 च्या जीआरनुसार दिव्यांग बांधवांना नगरपालिका गाळे द्यावेत, ट्रायसायकल वाटप: अद्याप वाटप न झालेल्या ट्रायसायकली त्वरित वितरित कराव्यात, शाळा निधी भ्रष्टाचार चौकशी: 1 कोटी 98 लाख निधीच्या भ्रष्टाचाराची चौकशी तातडीने करावी,खाजगी दवाखान्यांचे परवाने व तपासणी: यवतमाळ शहरातील 106 खाजगी दवाखान्यांचे फायर ऑडिट व परवानग्या तातडीने तपासाव्यात, रमाबाई आंबेडकर आयुर्वेदिक दवाखाना सुरू करावा,नवीन सार्वजनिक शौचालय त्वरित कार्यान्वित करावे,अनधिकृत कर्मचाऱ्यांना बडतर्फ करावे,दिव्यांगांसाठी समान योजना राबविण्यात याव्या जिल्हा परिषदेच्या धर्तीवर त्याच प्रकारे नगरपरिषद धरतीवर सारख्याच योजना असाव्यात
▪️गणतंत्र दिन जयस्तंभाजवळ साजरा करण्याचा निर्धार
यवतमाळ प्रशासनाने जर आंदोलनाची दखल घेतली नाही, तर दिव्यांग बांधवांनी गणतंत्र दिवस जयस्तंभाजवळ साजरा करण्याचा निर्धार केला आहे. “आम्हाला फक्त आश्वासने नकोत, ठोस कार्यवाही हवी,” असा संतप्त इशारा आंदोलकांनी दिला आहे.
▪️प्रशासनाची भूमिका काय?
यवतमाळ नगरपरिषद, जिल्हा प्रशासन आणि संबंधित विभागांनी या आंदोलनावर कोणती भूमिका
या उपोषणाला गुरुदेव युवा संघ दिव्यांग संघटनेचे समाधान रंगारी, रितेश चौधरी, नासिर भाई, संतोष तिजारे, माया एलसरे, विजय जाधव, प्रल्हाद खोब्रागडे, शहजाद खान, व इतर दिव्यांग बांधव उपस्थित आहे.