नवी दिल्ली /नवप्रहार ब्युरो
प्रेमा बद्दल बोलल जात की प्रेम हे आंधळ असतं. प्रेम कधी कोणावर आणि कसे होईल हे सांगता येत नाही. प्रेमात जात – पात, गरीब – श्रीमंत हा भेद्याव नसतो. आता तर प्रेमात देशाच्या सीमेच्या मर्यादा देखील नसतात हे पाहायला मिळत आहे. मागील काळात अनेक विदेशी मुली भारतीय मुलांच्या प्रेमात पडून त्यांनी भारतात येऊन लगीनगाठ बांधली आहे. याच श्रूखलेत आणखी एक स्टोरी जडल्या गेली आहे.
. विदेशातील एका मुलीचे भारतातील एका भाजी विक्रेत्यावर प्रेम जडले आणि तिने लग्नासाठी थेट भारतच गाठले.
सध्या सोशल मीडियावर एक गोष्ट चांगलीच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये गुजरातमधील एका भाजी विक्रेत्याची मैत्री फिलीपिन्समध्ये राहणाऱ्या एका मुलीशी झाली आणि तिने थेट भारत गाठले. मिळालेल्या माहितीनुसार, ही गोष्ट आहे पिंटू नावाच्या गुजरातमधील एका घाऊक भाजीपाला व्यापाऱ्याची. त्याने फेसबुकवर फिलीपिन्समधील एका मुलीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. ती मुलगी तिच्या वडिलांसोबत रेस्टॉरंट चालवते. पण, पिंटूला इंग्रजी येत नसल्याने सुरुवातीला त्यांचे संभाषण फक्त हाय आणि हॅलोपुरते मर्यादित ठेवले होते. त्यानंतर त्यांनी इमोजी आणि व्हिडिओंद्वारे संवाद साधण्यास सुरुवात केली. अशामध्ये पिंटूने सांगितले आहे की, आम्ही नीट बोलू शकत नव्हतो. पण तिच्या हावभावावरून सर्व काही कळत होते. पिंटूच्या दयाळू, संवेदनशील तसेच प्रामाणिक वागण्याने ती प्रभावित झाल्याचे तिने सांगितले.
इंस्टाग्रामवरील storiyaan_ नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आलेल्या या गोष्टीनंतर प्रेमाला भाषेची गरज नसते हे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचे या पेजवरून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच, या पोस्टमध्ये म्हटले आहे की, एके दिवशी पिंटूने तिला एक पार्सल पाठवले, ज्यामध्ये त्याने मुलीला भेटवस्तू देत मागणी घातली. तिने व्हिडिओ कॉलवर पार्सल उघडले आणि दोघांच्या डोळ्यात पाणी आले. तिने हो म्हटले, तरीही दोन वर्षे ते दोघे एकमेकांपासून लांब असूनही नात्यात राहिले. त्यांनतर नंतर पिंटू तिच्या कुटुंबाला भेटण्यासाठी फिलीपिन्सला गेला. त्याच्या कुटुंबालाही ती खूप आवडली आणि अखेर त्यांनी ख्रिश्चन तसेच हिंदू पद्धतीने लग्न केले.