हटके

बेपत्ता असलेल्या चार मुली सापडल्या 904 किमी अंतरावर, पोलिसांचे होतेय कौतुक

Spread the love
कल्याण / विशेष प्रतिनिधी
              शाळेत गेलेल्या चार अल्पवयीन मुली शाळेतून घरी न परतल्याने पालकांची दाणादाण उडाली. पहिले त्यांनी त्यांचा शोध घेतला पण त्या कुठेच आढळून न आल्याने पालकांनी पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी देखील घटनेचे गांभीर्य ओळखून लगेच गुन्हा दाखल करून घेत चार पथके बनवून विविध दिशेने रवाना केले. पोलिसांच्या तपासात जी माहिती समोर आली त्यानंतर पोलिसांनी तपास अधिक वेगाने सुरू केला आहे.
कल्याणमधील नॅशनल उर्दू हायस्कूल या शाळेतील आठवी आणि नववीत शिकणाऱ्या चार अल्पवयीन मुलींनी त्यांच्या पालकांच्या जीवाला घोर लावला. 29 जूनला या मुली नेहमी प्रमाणे शाळेत गेल्या होत्या. शाळा सुटल्याची वेळ होऊनही या मुली घरी आल्याच नाही. मुलींच्या पालकांनी सर्वत्र यांचा शोध घेतला. मात्र, या मुली कुठेच सापडल्या नाहीत अखेरीस मुलींच्या पालकांनी बाजारपेठ पोलिसात या संदर्भात तक्रार दिली.
पोलिसांनी तात्काळ या संदर्भाचा गुन्हा दाखल करून चार विविध पथक त्यांच्या शोधासाठी रवाना केली. याच दरम्यान रेल्वे स्थानक, स्टेशन परिसर, शाळेच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही, मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक माहितीच्या आधारे या मुलींचा शोध सुरू झाला. त्याच दरम्यान या मुली राजस्थानकडे जाणाऱ्या ट्रेनने प्रवास करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार बाजारपेठ पोलिसांनी रेल्वे पोलिसांच्या मदतीने राजस्थानमधील मारवाड रेल्वे स्थानकातून या चारही मुलींना सुरक्षितपणे आपल्या ताब्यात घेतलं.
 या चारही मुली अजमेर येथे देव देवदर्शनासाठी जात असल्याची माहिती मिळते आहे. मात्र, तरी देखील विविध अंगांनी या संदर्भाचा अधिक तपास पोलीस करत आहेत. मात्र पोलिसांनी अवघ्या दोन दिवसात या मुलींचा शोध घेऊन त्यांना सुखरूपपणे कल्याणला परत आणल्याने पोलिसांच्या कामगिरीचं कौतुक केलं जात आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close