सामाजिक
चंद्रपूर जिल्ह्यात DNR ट्रॅव्हल्स ट्रक अपघात
राजुरा (छबिलाल नाईक, प्रतिनिधी)
चंद्रपूर जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. अश्यातच चंद्रपूर-नागपूर महामार्गांवर वरोरा जवळ नंदोरी टोल नाका नवीन उड्डाणं पुला जवळ आज २:३० वाजताच्या सुमारास नागपूर ला जात असलेल्या DNR ट्रॅव्हल्स क्र. एम.एच. ३४ बी एच ७५७७ तर विरुद्ध दिशेने येणारा ट्रक क्र. एम.एच. ३४ ए बी ३८४० ला धडक बसली. धडक इतकी जोरदार होती की, ट्रॅव्हल्स चा समोर चा भाग चेंदमेंदा झाला आहे.
यात अनेक प्रवासी व चालक जखमी झाल्याचे कळले आहे. परंतु अधिकृत माहिती मिळाली नाही. DNR ट्रॅव्हल मधील जखमी प्रवाशांना उपजिल्हारुग्णालयात येथे ट उपचारासाठी दाखल केले. पुढील तपास वरोरा पोलीस करित आहे.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1