क्राइम
चहा ने घेतला जीव ; पतीचे पत्नीवर तलवारीने वार
गाझियाबाद (युपी) / नवप्रहार वृत्तसेवा
‘ चहा ‘ अनेकांना अंथरून सोडण्यापूर्वी तो हवा असतो. तर काहींना प्रातः विधी पूर्वी , काहींना काम करून करून कंटाळा आल्यावर मड फ्रेश करण्यासाठी एकंदरीत पाहता ‘ चहा ‘ हा सगळ्यांचा आवडता पेय. पण तुम्हाला कोणी सांगितलं की चहा मुळे जीव गेला तर सहसा तुमचा त्याच्यावर विश्वास बसनार नाही . काही प्रकरणात चहात विष वैगेरे देऊन जीव घेतल्याच्या घटना घडतात. पण ही घटना काहीशी वेगळीच आहे. चहा करायला वेळ लागेल असे उत्तर ऐकून पतीचा असा पारा चढला की त्याने पत्नीवर तलवारीने वार करून तिचा जीवच घेऊन टाकला.मोदीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून तलवारही जप्त केली आहे.
धर्मवीर असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव – धर्मवीर असं अटक करण्यात आलेल्या पुरुषाचं नाव आहे. तो ५२ वर्षांचा आहे. त्याच्या पत्नीने म्हणजेच सुंदरीने त्याला वेळेवर चहा दिला नाही. त्यावरुन या दोघांमध्ये वाद झाला. या वादाचं रुपांतर मोठ्या भांडणात झालं आणि त्याच संतापाच्या भरात पतीने पत्नीवर तलवारीचे वार करुन तिची हत्या केली. राजधानी दिल्लीजवळ असलेल्या गाझियाबादमधल्या भोजपूर या गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. सुंदरी ५० वर्षांची होती. धर्मवीर आणि सुंदरीला चार मुलं आहेत. ही घटना घडली तेव्हा मूलं झोपली होती असंही
पोलिसांनी काय सांगितलं?
सकाळी धर्मवीरने पत्नीला चहा ठेवायला सांगितला. त्यावर तिने थोडा वेळ लागेल असं उत्तर दिलं ज्यावरुन या दोघांचं भांडण सुरु झालं. धर्मवीरने रागाच्या भरात तलवार उचलली आणि तिच्या मानेवर पाठीमागून सपासप वार केले. या घटनेत तिचा जागीच मृत्यू झाला अशी माहिती सह पोलीस आयुक्त ग्यानप्रकाश राय यांनी दिली आहे. सुंदरीवर वार झाले तेव्हा ती जोरात ओरडली. तिचं ओरडणं ऐकूनच शेजारी जमा झाले आणि हा प्रकार समोरआला.




