क्राइम

तीन रुग्णालया वर  कोरोना काळात २२ मृत व्यक्तीच्या नावावर २ कोटी उकळल्याचा आरोप

Spread the love

नाशिक / विशेष प्रतिनिधी

कोरोना काळात अनेक रुग्णालयाकडून उपचाराच्या नावावर कथित कोरोना ग्रस्त रुग्णांना लाखो रुपयांनी गंडविल्याचा आरोप झाला होता. पण आता त्यापेक्षाही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.कोरोना काळात मृत झालेल्या २२ लोकांच्या नावावर शासनाला तीन रुग्णालयांनी २२ कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आलाय. यामुळे शासना सह वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे.

आयुष्मान भारत योजना आणि महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेच्या नावाखाली हा कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करण्यात आलाय. याप्रकरणी नाशिकमधील तीन नामांकित रुग्णालयांच्या संचालकांवर मुंबईतील वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

कोरोना काळात ज्या 22 रुग्णांचा मृत्यू झाला होता, ते रुग्ण जिवंत असल्याचे दाखवून त्यांच्या नावावर तब्बल 6 वर्षांनंतर शासकीय योजनांतर्गत खोटे क्लेम दाखल करण्यात आले. या तिन्ही रुग्णालयांनी वैद्यकीय कागदपत्रांमध्ये हेरफेर करत शासनाकडून सुमारे 2 कोटी रुपयांचा निधी या हॉस्पिटल्सनं लाटला.

विधानमंडळाच्या अधिवेशनात आमदार डॉ. राहुल आहेर यांनी हा गंभीर मुद्दा उपस्थित केला होता. या घोटाळ्याचे गांभीर्य लक्षात घेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक अर्थात एसआयटी स्थापन करण्यात आलीय.

या एसआयटीकडून या संपूर्ण प्रकरणाचा स्वतंत्र आणि सखोल तपास सुरू आहे. मृत रुग्णांच्या नावावर बोगस क्लेम करून निधी लाटणाऱ्या या रॅकेटमध्ये केवळ रुग्णालयांचे संचालकच नव्हे, तर आरोग्य विभागातील आणि शासकीय यंत्रणेतील काही अधिकारी व कर्मचारी सहभागी असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. त्यामुळे येत्या काळात या घोटाळ्यात आणखी काही रुग्णालये आणि बड्या अधिकाऱ्यांची नावे समोर येण्याची दाट शक्यता वर्तवली जातेय.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close