देवेंद्रपर्व…शपथविधी मुंबईत जल्लोष वणीत
● फटाक्यांची आतिषबाजी, ढोलताशांचा गजर
वणी | राज्यात महायुतीने दणदणीत अभूतपूर्व यश संपादन केले. नागरिकांना सत्ता स्थापनेची उत्सुकता होती. अखेर शपथविधीला मुहूर्त मिळाला, गुरुवार दिनांक 5 डिसेंबर ला 5: 30 वाजता मुख्यमंत्री व दोन उप मुख्यमंत्र्यांना राज्यपालांनी शपथ दिली. शपथग्रहण सोहळा मुंबईत होता मात्र भाजप पदाधिकाऱ्यांनी जल्लोष वणीत केला.
राज्यात देवेंद्रपर्वाला सुरवात झाली आहे. भाजपचे 132 आमदार निवडून आल्यानंतर भाजपा श्रेष्ठींनाही फडणवीस यांच्या निवडीशिवाय पर्याय उरला नव्हता. राज्याला आज नवं सरकार मिळणार आहे. राज्याला पुन्हा एकदा एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असं समीकरण पाहायला मिळालं आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून अजित पवारांनी सहाव्यांदा आणि एकनाथ शिंदेंनी पहिल्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राज्यात आता देवेंद्रपर्वाला सुरुवात झाली आहे. या अभूतपूर्व सोहळ्याचे थेट प्रक्षेपण येथील टिळक चौकात करण्यात आले. माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या उपस्थितीत भाजपचेव युतिचे पदाधिकारी विनोद मोहितकर, विजय पिदुरकर,दिनकर पावडे,रवि बेलुरकर, आशिष मोहीतकर,संजय पिंपळशेंड, नितिन वासेकर,गजानन विधाते, श्रीकांत पोटदुखे, राकेश बुग्गेवार,संतोष डंभारे,ललित लांजेवार,व कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी केली तर ढोलताशांचा गजर करत मोठ्या उत्साहात जल्लोष केला.