सामाजिक

“भव्य रक्तदान शिबिरा” चे आयोजन 

Spread the love
वरुड /  योगेश भेलकर
                   शहरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आज (सोमवार ) दि. 16 डिसेंबर 2024 रोजी स्थानिक इंदिरा चौक, बीएसएनएल समोर ,वरुड येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
                   वाढते अपघात आणि असाध्य रोग यात कराव्या लागणाऱ्या शस्त्रक्रियेसाठी रक्ताची फारच गरज भासते. अश्या आपात्कालीन स्थितीत लोकांना रक्ता साठी भटकावे लागते. ही बाब ध्यानात ठेवून अनेक सामाजिक संस्था रक्तदान शिबिराचे आयोजन करत असतात.
              वरुड शहरात  सिद्धेश नरेशजी टाकरखेडे व मित्र परिवाराच्या वतीने इक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आज  सोमवार 16 डिसेंबर 2024 ला  बीएसएनएल ऑफिस समोर इंदिरा चौक येथे सकाळी 10 ते 4 पर्यंत हा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा. आ. श्री चंदू भाऊ उर्फ उमेश आत्मारामजी  यावलकर लाभणार आहेत. या शिबिराला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशी विनंती  नरेश शंकरराव टाकरखेडे , डॉ. सौ.भक्ती अजिंक्य पाचघरे , केतन संजय पाचघरे , अनुचंदा हॉस्पिटल , आशा चॅरिटेबल ट्रस्ट , सहजीवन सोशियाल क्लब , न्यू प्रियदर्शीनी दुर्गा मंडळ ,वरुड यांनी केली आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close