भा.ज.यु.मो तर्फे रक्तदान शिबिर उत्साहात.
भाजपाच्या ४३ व्या स्थापना दिनानिमित्त भा.ज.यु.मो ब्रह्मपुरी तालुक्याच्या वतीने आयोजन.
गांगलवाडी / प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाच्या ४३व्या स्थापना दिन व जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून ब्रह्मपुरी विधानसभेचे माजी आमदार अतुलभाऊ देशकर यांच्या नेतृत्वात भारतीय जनता युवा मोर्चा ब्रह्मपुरी तालुक्याच्या वतीने तालुक्यातील गांगलवाडी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरात भारतीय जनता युवा मोर्चा ब्रह्मपुरी तालुक्याच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सहभागी होत भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस साजरा केला. भारतीय जनता पार्टीचे लक्ष्य असलेल्या अंत्योदयाचे लक्ष्य ठेवून समाजातील शेवटचा घटक समाधानी राहावा या उद्देशाने भाजयुमोच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात एकूण 53 युवकांनी रक्तदान केले.
गांगलवाडीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात ब्रह्मपुरी विधानसभेचे माजी आमदार, भाजपा नेते प्रा. अतुलभाऊ देशकर यांच्या शुभहस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी प्रामुख्याने भाजपा ओबीसी आघाडीचे प्रदेश कार्य. सदस्य प्रा. प्रकाश बगमारे, भाजपा तालुकाध्यक्ष प्राचार्य अरुण शेंडे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. जी. एम. बालपांडे, प्रा. आ. केंद्राचे डॉ.धम्मरक्षीता रामटेके, डॉ.भाग्यश्री पानसे, भाजपा महिला आघाडीच्या उपाध्यक्षा सौ.वंदनाताई शेंडे, अनु. जमातीचे तालुकाध्यक्ष राजेश्वर मगरे, ओबीसी आघाडीचे तालुकाध्यक्ष प्रेमलाल धोटे हे उपस्थित होते. डॉक्टर हेडगेवार रक्तपेढीच्या माध्यमातून रक्तदात्यांचे रक्त घेण्यात आले. सोबतच त्यांना प्रमाणपत्र, भेटवस्तू व डोनरकार्डचे वितरण करण्यात आले.
या प्रसंगी भाजपा जिल्हा सचिव माणिक पा. थेरकर, भाजपा ओबीसी आघाडीचे जिल्हा महामंत्री मनोज भूपाल, जिल्हा सचिव रश्मी खानोरकर, साकेत भानारकर, महिला आघाडीच्या जिल्हा सचिव सौ. मंजिरी राजणकर, भाजपा ओबीसी मोर्चा महामंत्री सुभाष नाकतोडे, तळोधीचे सरपंच अनिल तिजारे, गोपाल ठाकरे उपसरपंच, बंटी गोंदोळे, गोगाव युवा मोर्चाचे अध्यक्ष वृषभ तिजारे, अंकुश ठवकर यांच्या सह मोठ्या संख्येने उपस्थित होते. युवकांनी मोठ्या संख्येने रक्तदान केल्याबद्दल भाजयुमो ब्रह्मपुरीचे तालुकाध्यक्ष प्रा. रामलाल दोनाडकर, जिल्हा सचिव तनय देशकर, तालुका महामंत्री यशवंत आंबोरकर, महामंत्री अविनाश मस्के, धीरज पाल,केवळराम आंबोरकर यांनी आभार मानले आहे.