डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन
अभिलाल दादा देवरे, धुळे जिल्हा सचिव वंचित बहुजन आघाडी आरोग्य सेवक यांच्यावतीने शिबिराचे आयोजन
अभिलाल दादा देवरे, धुळे जिल्हा सचिव वंचित बहुजन आघाडी आरोग्य सेवक यांच्यावतीने व श्रद्धेय बाळासाहेब प्रकाश आंबेडकर, प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर व गोविंद दळवी, राज्य उपाध्यक्ष यांच्या प्रेरणेने व ज्येष्ठ नेता भैय्यासाहेब पारेराव, अण्णासाहेब खेमनार, मनोज सिराम सर संस्थापक अध्यक्ष युवा मल्हार सेना, अरविंद निकम साहेब, अँड.चक्षुपाल बोरसे साहेब यांच्या मार्गदर्शनाने कुंडाणे 29/3/ 2023 बुधवार रोजी व 5/4/2023 रोजी नवलाणे गावात सेवा हॉस्पिटलचे मोफत आरोग्य शिबिरघेण्यात आले. आम्हाला नेहमी साथ देणारे चेअरमन डॉ. राजेश अग्रवाल, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. कुणाल मेहता, डॉ. श्रीकांत बामणे, डॉ. अर्जुन मराठे, डॉ. दीपक शर्मा, विजय मगर, डॉ. हेमंत चौधरी, डॉ. धिरज थोरात, डॉ. अनुषा निकुम मॅडम, डॉ. दिपाली पाटील मॅडम, नर्स फाल्गुनी चित्ते नर्स आलिशिबा वसावे, नर्स मनिषा पाडवी, रेखा पाडवी, राजश्री मुंडे, पल्लवी अलंकार, मुजम्मिल अन्सारी सर्वांच्या मदतीने शिबिरात उपचार जनरल तपासणी मेडिसीन, ईसीजी, सर्व मोफत तसेच ईसीजी मध्ये जर काय बदल असलं तर गव्हर्नमेंटच्या रोल नुसार ७ ते १० दिवस सर्व उपचार मोफत केला जातो. अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी सेवा हॉस्पिटलमध्ये सर्व मोफत केले जातात.आरोग्य सेवक अभिलाल दादा देवरे 88 88 94 62 54 यांच्या मार्गदर्शनाने सुट्रेपाडा, आनंदखेडा, उडाणे, गोताने, चौगाव, कुंडाणे, सांजोरी, कुसुंबा, नवलाने, निकुंभे, अक्कलपाडा, खंडलाय, विश्वनाथ, मोराने, सडगाव, चिंचवार आर्वी बल्हाने अकलाड बोरवीर चोपडाई असे धुळे ग्रामीणमध्ये 2021, 22,23 या तीन वर्षापासून सातत्याने अभिलाल दादा देवरे यांच्या मार्गदर्शनाने हजारो रुग्णांचा मोफत उपचार केला गेला आहे. अभिलाल दादा देवरे उ.महाराष्ट्र युवा कार्याध्यक्ष धनगर समाज युवा मल्हार सेना हे सांगतात की मला नेहमी साथ देणारे सेवा हॉस्पिटल चे मालक व सर्व स्टॉप , धुळे सिविल हॉस्पिटलचे डीन डॉ. अरुण मोरे सर डॉ नीता हटकर मॅडम व त्यांचा संपूर्ण स्टॉप, जे जे हॉस्पिटल मुंबई डीन डॉ.पल्लवी साबळे मॅडम व त्यांचा संपूर्ण टॉप या सर्वांच्या सहकार्याने मी गोरगरीब रुग्णांची सेवा करू शकलो. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या संपूर्ण देशाला आपल्या घटनेमध्ये ज्याचा त्याचा हक्क मिळवून दिला आहे. गोरगरीब श्रीमंत जात-भेद छोटा मोठा असा भेदभाव कधी केला नाही त्यांच्या विचारावर चालणारे बाबासाहेबांचे वारस आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब वंचित बहुजन आघाडी यांचा मायेचा हात माझ्या डोक्यावर बसला आणि त्या दिवसापासून मी अभिलाल दादा देवरे धुळे जिल्हा व संपूर्ण महाराष्ट्रात माझी ओळख निर्माण झाली. असे महामानवाला कोटी कोटी वंदन🙏