विशेष
न्यायाधीशांनी शिक्षा सुनावतातच आरोपीने मारली पाचव्या मजल्यावरून उडी


न्यायाधीशांनी शिक्षा सुनावतातच आरोपीने मारली पाचव्या मजल्यावरून उडी
नवी मुंबई / विशेष प्रतिनिधी
बहिणीची हत्या आणि पत्नीवर प्राणघातक हल्ल्या प्रकरणात आरोपी असलेल्या व्यक्तिला न्यायालयाने शिक्षा सुनावताच आरोपीने पाचव्या मजल्यावरून उडी घेतल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना बेलापूरमध्ये घडली आहे.
नागेश बाबू लाड (वय 34) असे मृत आरोपीचे नाव असून, सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली.
2019 मध्ये नेरुळ परिसरात पत्नीवर चाकूने वार करून तिला गंभीर जखमी केल्यानंतर आरोपीने सख्ख्या बहिणीची चाकूने भोसकून हत्या केली होती. पत्नीचे बहिणीच्या पतीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून त्याने हे कृत्य केल्याचा आरोप होता. या दुहेरी हल्ल्यानंतर फरार झालेल्या नागेश लाडला नेरुळ पोलिसांनी तुर्भे नाका परिसरातून अटक केली होती. तेव्हापासून तो न्यायालयीन कोठडीत होता. सोमवारी बेलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात या खटल्याची अंतिम सुनावणी झाली. न्यायालयाने उपलब्ध पुरावे आणि साक्षींच्या आधारे नागेश लाडला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
नागेशचा जागेवर मृत्यू
शिक्षा सुनावल्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेसाठी आरोपीला बाहेर आणण्यात आले. याचवेळी शौचालयात जाण्याचा बहाणा करून त्याने न्यायालयाच्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील मोकळ्या जागेतून खाली उडी घेतली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या नागेशचा मृत्यू झाला.न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले. या घटनेमुळे न्यायालयीन परिसरात मोठी खळबळ उडाली असून, न्यायालयातील सुरक्षा व्यवस्था आणि आरोपीच्या देखरेखीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. याप्रकरणी सीबीडी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
| Cookie | Duration | Description |
|---|---|---|
| cookielawinfo-checkbox-analytics | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Analytics". |
| cookielawinfo-checkbox-functional | 11 months | The cookie is set by GDPR cookie consent to record the user consent for the cookies in the category "Functional". |
| cookielawinfo-checkbox-necessary | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookies is used to store the user consent for the cookies in the category "Necessary". |
| cookielawinfo-checkbox-others | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Other. |
| cookielawinfo-checkbox-performance | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Performance". |
| viewed_cookie_policy | 11 months | The cookie is set by the GDPR Cookie Consent plugin and is used to store whether or not user has consented to the use of cookies. It does not store any personal data. |
No WhatsApp Number Found!