विदेश

बाजारात लवकरच येणार पुरुषांसाठी गर्भनिरोधक गोळी 

Spread the love

               लग्नानंतर किंवा लग्नापूर्वी आलेल्या शारीरिक संबंधात महिलेला गर्भधारणा होऊ नये यासाठी महिलेला गर्भनिरोधक औषधी घ्याव्या लागतात. पुरुषांकडे कंडोम वापरण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. कंडोम देखील फार सुरक्षित साधन आहे असे खात्रीने म्हणता येत नाही.कारण समागमाच्या वेळेस जर कंडोम फाटला तर गर्भधारणा होण्याची शक्यता असते. गर्भधारणा होऊ नये यासाठी महिलांनीच का काळजी घ्यावी ? कारण त्यासाठी पुरुषांची देखील जबाबदारी बनते. याच प्रश्नाला घेऊन अमेरिकेत पुरुषांच्या गर्भनिरोधक गोळीवर संशोधन सुरू झाले आहे.आणि लवकरच ही गोळी बाजारात उपलब्ध होणार आहे.

अमेरिकेतील वेल कॉर्नेल मेडिसन येथील शास्त्रज्ञ हार्मोन्समध्ये बदल करण्याऐवजी थेट शुक्राणूंच्या हालचालींवर परिणाम करणाऱ्या पुरूषांच्या गर्भनिरोधक गोळीवर सध्या काम करत आहेत. या संशोधनामध्ये शास्त्रज्ञांनी शरीरातील सोल्युबल अॅडेनायलेट सायक्लेज नावाच्या एका विशिष्ट एन्झाइमवर लक्ष केंद्रीत केले आहे. शुक्राणूंना पुढे जाऊन अंड्यापर्यंत पोहोचण्यासाठी या एन्झाइमची आवश्यकता असते. गर्भनिरोधक गोळी या एन्झाइमला तात्पुरते अवरोधित करून काम करते. यामुळे शुक्राणूंना सामान्यपणे हालचाल करण्यापासून थांबवले जाते. त्यामुळे शुक्राणूंची अंड्यापर्यंत पोहचण्याची क्षमता कमी होते आणि गर्भधारणेचा धोका टळतो.

पुरूषांसाठी तयार करण्यात येत असलेल्या या गर्भनिरोधक गोळीच्या वापराबाबत देखील महत्वाची माहिती समोर आली आहे. या गोळीचे वैशिष्ट्य म्हणजे तिच्या वापराची पद्धत आहे. शास्त्रज्ञ तयार करत असलेली ही गर्भनिरोधक गोळी पुरूषांना संभोगाच्या अर्धातास आधी घेता येईल. ही गोळी खाल्ल्यानंतर त्याचा प्रभाव ६ ते ८ तास टिकतो असे संशोधनात दिसून आले. जर भविष्यामध्ये हे औषध मानवांमध्ये सुरक्षित आणि प्रभावी असल्याचे सिद्ध झाले तर ते दररोज घेण्याची गरज भासणार नाही. त्याचा वापर गरजेनुसार केला जाऊ शकतो. हे सर्व प्राथमिक संशोधनावरून सांगितले जात आहे. पण मानवांवरील त्याच्या प्रभावाचा कालावधी फक्त क्लिनिकल चाचण्यांनंतर स्पष्ट होणार आहे.

ही गोळी खाल्ल्यानंतर शुक्राणूंची निर्मिती थांबेल का? असा प्रश्न देखील अनेकांना पडला आहे. तर त्याचे उत्तर नाही असे आहे. कारण ही गोळी खाल्ल्याने पुरूषांमधील शुक्राणूंची निर्मिती थांबत नाही. या गोळीचा मुख्य उद्देश शुक्राणूंची हालचाल तात्पुरती रोखणे किंवा कमी करणे हा आहे. ही गोळी खाल्ल्यानंतर पुरूषांच्या शरीरामध्ये शुक्राणूचे उत्पादन सुरू राहू शकते. पण जोपर्यंत औषधाचा प्रभाव आहे तोपर्यंत शुक्राणूच्या हालचाल करण्याच्या क्षमेतेवर परिणाम होऊ शकतो.

या औषधाचा प्रभाव कमी झाल्यानंतर शुक्राणूंची सामान्य हालचाल परत येण्याची शक्यता आहे. त्यामुळेच औषधाचा प्रभाव कमी झाल्यावर पुरूषांची प्रजनन क्षमता सामान्य होते की नाही हे शास्त्रज्ञांसाठी निश्चत करणे खूप महत्वाचे राहिल. पुरुषांसाठीची ही गर्भनिरोधक गोळी फक्त गर्भधारणा टाळण्यासाठी तयार केली जात आहे. ती लैंगिक संबंधातून पसरणाऱ्या संसर्गांपासून संरक्षण देणार नाही. संसर्ग टाळण्यासाठी कंडोमचा वापर आवश्यक असेल असे डॉक्टर म्हणाल्या. सध्या ही गोळी संशोधन आणि प्रायोगिक टप्प्यात आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close