आज कर्करोग विषयी विशेष शिबिर ….

नागपूरचे कर्करोग तज्ञ डॉ.सुशील मानधनिया विशेष मार्गदर्शन करणार…
श्रीमंत गणेश मंडळाचे आयोजन….

धामणगाव रेल्वे
अमर शहीद भगतसिंग चौक तसेच श्री रामदेव बाबा मंदिर परिसरातील श्रीमंत गणेश मंडळातर्फे
महिलांचे आरोग्य आणि कर्करोग यासंबंधी महत्त्वपूर्ण माहिती आणि जनजागृतीसाठी मार्गदर्शक सूचना याकरिता महिलांसाठी विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे
आज रविवार दिनांक २० सप्टेंबर २०२६ ला सेवा स्मृति भवन प्रांगण धामणगाव रेल्वे येथे दुपारी ४ वाजता आयोजित उपरोक्त कर्करोग शिबिर करिता मार्गदर्शक म्हणून नागपूर येथील प्रसिद्ध कर्करोग तज्ञ डॉक्टर सुशील मानधनिया विशेष रूपाने उपस्थित राहणार आहेत
अनेक प्रकारचे कर्करोग असतात त्यामुळे या कर्करोग विषयी सविस्तर माहिती या शिबिरामध्ये सर्व महिलांना दिल्या जाणार आहेत
महिलांनी शिबिरामध्ये उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा अशी विनंती श्रीमंत गणेश मंडळाने केलेली आहे




