क्राइम

खोली क्रमांक २०४ आणि पोलिसांची कारवाई 

Spread the love

जयपूर / विशेष प्रतिनिधी

             जयपूर मधील त्या हॉटेल मध्ये जेव्हा पोलिस पोहचले तेव्हा सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. पण आधीपासूनच पूर्ण माहिती घेतलेल्या पोलिसांनी हॉटेल च्या आत येताच सरळ खोली क्र.२०४ ची बेल दाबली. खोली चे दार उघडताच पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता आत प्रवेश केला. आणि येथील मोबाईल आणि लॅबटॉप ताब्यात घेतला. खोलीतील दोन तरुण आणि एका तरुणीला ताब्यात घेतले. येथून ऑनलाइन सट्टा खेळल्या जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. 

जयपूरच्या वैशाली नगर परिसरातील ही घटना आहे.
पोलिसांना प्राथमिक तपासातून खोली क्रमांक २०४ मधून जवळपास ६ लाख रुपयांच्या व्यवहारांचा हिशोब मिळाला आहे. आरोपींच्या अंदाजानुसार, दर महिन्याला अवैध मार्गानं १८ लाख रुपयांची कमाई व्हायची. क्रिकेट आणि अन्य खेळांवर ऑनलाईन पैसे लावले जायचे. म्हणजे मैदानात सामने सुरू असायचे आणि हॉटेलच्या खोलीत बसून हे त्रिकूट सामन्यांच्या निकालावर सट्टा लावायचं काम करायचं.
पोलिसांना हॉटेलच्या खोलीत दोन लॅपटॉप, एक लॅपटॉप आणि पाच मोबाईल सापडले आहेत. पोलिसांना सापडलेली उपकरणं तपासाच्या दृष्टीनं महत्त्वाची आहेत. पोलीस यातला डेटा शोधून काढत आहेत. सट्टेबाजीचं नेटवर्क कसं चालायचं आणि त्याची व्याप्ती कुठपर्यंत होती, याची माहिती उपकरणांमधील माहितीमधून उघड होणार आहे.

पोलिसांनी पकडलेल्या तिन्ही आरोपींची ओळख पटली आहे. अशोक पौडेल, परीना गिरी (दोघे नेपाळचे) आणि पवन वैष्णव (पुणे) अशी तिघांची नावं आहेत. आरोपींच्या चौकशीतून महत्त्वाची माहिती उघडकीस आली आहे. आरोपी एका जागी राहून सट्टेबाजीचं काम करायचे नाहीत. ते सातत्यानं त्यांचा ठावठिकाणा बदलत राहायचे.

जयपूरच्या हॉटेलमधील खोली आरोपी त्रिकूटाची तात्पुरती सोय होती. याआधी ते कुठे कुठे मुक्कामी होते, त्यांच्या संपर्कात कोण कोण होतं आणि हा पैसा नेमका कुठे जायचा, याचा शोध पोलीस घेत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close