क्राइमराज्य

अंडाशय प्रकरणातील मुख्य आरोपिला अटक , अंतरराज्यीय रॅकेट असल्याचा संशय

Spread the love

 

गोरगरीब महिलांना पैशाचे आमिष देऊन अंडाशय विक्रीस पाडत होती भाग 

बदलापूर /विशेष प्रतिनिधी

परिसरातील गोरगरिब जनतेला पैशाचे आमिष देऊन तर कधी मध्यस्थांच्या मार्फत अंडाशय विक्रीस भाग पाडणाऱ्या मास्टर माईंड ला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी प्रकरणातील मुख्य आरोपी सुलक्षणा गाडेकरला अटक केली आहे. सोबतच तिला या कामात मदत करणाऱ्या उल्हासनगरातील तिची साथीदार अश्विनी चाबुकस्वार, मंजुषा वानखेडे या ३ महिलांना अटक केली आहे. अंडाशय विक्रीचे आंतरराज्यीय रॅकेट असल्याचा पोलिसांना संशय आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात ३०० हून अधिक महिला पीडित आहे. या सर्व महिलांना अंडाशयामागे २० हजार रुपये दिले जात होते. तर मध्यस्थ महिलांना प्रत्येकी ३ हजार रुपये देण्यात येत होते अशी उघड झाली आहे. या अंडाशयांची केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये विक्री केली जात होती. पोलिसांनी मात्र या संपूर्ण तस्करी प्रकरणाबद्दल काहीही बोलण्यास नकार दिलाय.

या अंडाशय तस्करी प्रकरणात अटक करण्यात आलेली मुख्य सूत्रधार सुलक्षणा गाडेकर ही बदलापुरातल्या खरवईतील नॅनो सिटीत राहत होती. महिनाभरापूर्वीच ती याठिकाणी राहण्यास आली होती. या नॅनो सिटीतील सी विंगमध्ये ९०३ क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये ती राहत होती. मात्र काही दिवसांपूर्वीच तिने आपल्या नावाची पाटी देखील काढली. पोलिसांनी या महिलेच्या घराची झडती घेतली असता संशयास्पद इंजेक्शन सापडले. पोलिसांनी गाडेकरच्या घरातून गर्भाशयासाठी वापरण्यात येणाऱ्या इंजेक्शन्सचे फोटो, सोनोग्राफीचे फोटो, खोटी प्रतिज्ञापत्रं, महिलांचे फोटो आणि इतर संशयास्पद कागदपत्रे जप्त केली आहेत.

गर्भाशयात स्त्री बीजाची वाढ होण्यासाठी लागणारे इंजेक्शन्स मुख्य आरोपी सुलक्षणा गाडेकरने आपल्या घरातच साठवले होते. ती महिला गरजू महिलांना पैशांचं आमिष दाखवून हे इंजेक्शन्स देत होती. तसंच डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बेकायदेशीरपणे सोनोग्राफी देखील करून घ्यायची. गर्भाशयात स्त्री बिजाची वाढ झाल्यानंतर अशा महिलांना गाडेकर ही आयव्हीएफ सेंटरमध्ये पाठवायची. तिथं ऑपरेशन थिएटरमध्ये नेऊन गर्भाशयातील अंडाशय काढलं जायचे. त्यानंतर त्याची सऱ्हासपणे विक्री करण्यात येत होती.

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close