शाशकीय

शेतातील केबल चोरणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रा चे जाळयात 

Spread the love
अमरावती / प्रतिनिधी
             एसपी विशाल आनंद यांनी एलसीबी आणि स्थानिक पोलिसांना शेती साहित्य आणि केबल चोरी प्रकरणाचा तपास लावण्याचे आदेश दिले होते. एलसीबी ला या बद्दल गोपनीय माहिती मिळाली असता ते चोरांच्या मागावर होते.
दि.१३/१२/२४ रोजी तिन इसम त्यांचे मोटर सायकलवर प्लास्टीक पोत्यात तांबा तार भरुन विकी करीता कासदपुरा, अचलपुर परीससरात फिरत आहे.
अशा गोपनिय खबरेवरुन स्थागुशा पथकाने सदर इसमांचा कासदपुरा अचलपुर परीसरात शोध घेतला असता मिळालेल्या गोपनिय खबरेतील वर्णनाचे तिन इसम त्यांचे HF DELUX कंपणीची विनानंबर मोटर सायकलवर प्लास्टीक पोते घेवुन संशयितरित्या भंगार दुकानाकडे जाताना दिसुन आले. सदर इसमांना पंचासमक्ष ताब्यात घेवुन त्यांचे कडे असलेल्या प्लास्टीक पोत्याची पाहणी केली असता प्लास्टीक पोत्यात केबल जाळुन काढलेला अर्धवट जळालेला तांबा तार तसेच एक पेंचीस व नट खोलण्याचे दोन पाने दिसुन आले.
सदर इसमांना त्यांचे नाव गाव विचारुन त्यांना गुन्हयासंबंधाने विचारपुस केली असता त्यांनी आधी उडवाउडवीचे उत्तरे दिली परंतु त्यांना पुन्हा विश्वासात घेवुन विचारपुस केली असता आरोपी १) अविनाश सदाशिव इंगळे वय ३६ वर्ष रा. तळणी पुर्णा ता. चांदुरबाजार ,२) विजय किसनराव नांदणे वय २७ वर्ष रा. वासणी (बु) ता. अचलपुर ,।३) आकाश नारायण नांदणे वय २३ वर्ष रा. वासणी (बु) ता.अचलपुर सांगितले कि, त्यांनी दिघांनी मिळून मागील काही महिण्यात रात्री दरम्यान शिरजगाव हददीतील रतनपुर सायखेडा, सोमठाणा तसेच पथ्रोट हददीतील पाचआंबा शेतशिवारातील शेतातुन केबल चोरुन आणला आणी सदर केबल जाळुन त्यातील तांबा तार काढुन विकी करीता घेवुन जात असल्याचे सांगितले. आरोपींनी दिलेल्या कबुली वरुन त्यांनी चोरी केलेल्या शेतातील घटनास्थळाची व कालवधीची पाहणी केली असता आरोपींनी खालील प्रमाणे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले.
०१) पो.स्टे. शिरजगाव ४८९/२४ कलम ३०३ (२) भा.न्या. संहिता
०२) पो.स्टे. शिरजगाव २७९/२४ कलम कलम ३०३ (२) भा.न्या. संहिता
०३) पो.स्टे. पथ्रोट ७५/२४ कलम ३७९ भां.द.वि.
वरुन तिन्ही आरोपींकडुन वरील गुन्हयात चोरलेल्या केबल मधील जाळुन काढलेला तांबा तार कि. अं. ९९०० रुपये तसेच केबल चोरीसाठी वापरेलेली HF DELUX कंपणीची विनानंबर मोटर सायकल, एक पेंचीस, दोन पाने असा एकुण ८०,२०० रुपयाचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. तिन्ही आरोपींना पुढील तपासकामी पोलिस स्टेशन शिरजगाव कसबा यांचे ताब्यात देण्यात आले असुन आरोपींकडुन अधिक गुन्हे उघडकिस येण्याची शक्यता आहे.
सदरची कार्यवाही मा.श्री. विशाल आनंद सो. (भा.पो.से.) पोलिस अधिक्षक अमरावती ग्रा, मा.श्री. पंकज कुमावत सो. (भा.पो.से.) अप्पर पोलिस अधिक्षक अमरावती ग्रा., यांचे आदेशाने पोलिस निरीक्षक किरण वानखडे, पोलिस निरीक्षक अर्जुन ठोसरे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे स.पो.नि. सचीन पवार पोलिस अंमलदार युवराज मानमोठे, रविंद्र व-हाडे, स्वप्नील तंवर, सागर नाठे, शांताराम सोनोने, चालक प्रशात राजेश यांनी केली.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close