हटके
Related Articles
Check Also
Close
-
अन् त्याने प्रेयसी समोरच सोडला जीव ….!
4 weeks ago
साप म्हटलं की अंगावर काटा उभा राहतो. मग तो साप विषारी असो अथवा नाही. कारण त्या प्राण्याची दहशतच तशी आहे. पण अंगावर महाकाय अजगर विळखा घालून बसला असेल आणि त्याला त्याची कल्पना नसेल आणि तो आपल्या मस्तीत असेल तर याला काय म्हणाल. असे प्रत्यक्षात घडले आहे. आणि हा प्रकार घडला आहे नशेत टल्ली असलेल्या व्यक्तीसोबत.
या व्हिडीओमध्ये एक मद्यपीच्या अंगाला अजगर विळखा घालून बसलेला दिसत आहे. विशेष म्हणजे त्याला शुद्ध नाही की त्याच्या अंगावर भलामोठा अजगर बसला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही घाम फुटेल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला मद्यपी दिसेल. तो निवांत एका ठिकाणी बसलेला आहे. धक्कादायक म्हणजे त्याच्या अंगाला अजगर विळखा घालून बसलेला दिसत आहे. पण या मद्यपीने इतकी दारू प्यायली आहे की त्याला शुद्ध नाही की तो मृत्यूला कवटाळून बसलेला आहे. त्याला अजगराबरोबर बसलेले पाहून लोक जोरजोराने ओरडताना दिसत आहे. पण तरीसुद्धा त्याला कळत नाही. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. पुढे या मद्यपीबरोबर काय घडते, हे या व्हिडीओमध्ये दाखवले नाही. मीडियाच्या माहितीनुसार हा व्हिडीओ नांदयाल शहरातील आहे. नांदयाल हे आंध्र प्रदेश राज्यातील एक शहर आहे.
Ghar Ke Kalesh या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, ‘दारूच्या नशेत असलेल्या एका माणसावर अजगर चढला होता तेव्हा स्थानिकांनी त्याला वाचवले.’
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने मजेशीरपणे लिहिलेय, ‘अजगरला जास्त धोका होता, चांगले आहे की माणुस चावला नाही.’ तर एका युजरने लिहिलेय, ‘बरं झालं लोक मदतीला धावून आली.’ आणखी एका युजरने लिहिलेय, ‘मद्यपान आरोग्यासाठी खरंच चांगले नाही’ एक युजर लिहितो, ‘व्हिडीओ पाहून अंगावर काटा आला’ अनेक युजर्सनी व्हिडीओ पाहून संताप व्यक्त केला आहे तर काही युजर्सनी त्या मद्यपीची विचारपूस केली आहे.
Cookie | Duration | Description |
---|---|---|
cookielawinfo-checkbox-analytics | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Analytics". |
cookielawinfo-checkbox-functional | 11 months | The cookie is set by GDPR cookie consent to record the user consent for the cookies in the category "Functional". |
cookielawinfo-checkbox-necessary | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookies is used to store the user consent for the cookies in the category "Necessary". |
cookielawinfo-checkbox-others | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Other. |
cookielawinfo-checkbox-performance | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Performance". |
viewed_cookie_policy | 11 months | The cookie is set by the GDPR Cookie Consent plugin and is used to store whether or not user has consented to the use of cookies. It does not store any personal data. |