हटके

फ्रेंडशिप डे च्या दिवशी दोन मुलींनी तरुणाला धुतले

Spread the love

आग्रा ( यु पी ) / नवप्रहार मीडिया नेटवर्क 

              जगात एकीकडे फ्रेंडशिप दे साजरा केला जात असताना उत्तरप्रदेश च्या आग्रा येथून य3क धक्कादायक बातमी समीर येत आहे. येथे भर रस्त्यात दोन तरुणींनी एका तरुणाला धुतल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आग्राच्या कमला नगर पोलीस ठाणे परिसरातील हा व्हिडिओ असल्याचे सांगितले जात आहे.एका रोड रोमिओला दोन तरुणींनी चांगलीच मारहाण केली. या दोन तरुणांनी या तरुणाला चपलेने मारहाण केली. हा तरुण म्हणत होता की, मी तुझ्याविना नाही जगू शकणार. तब्बल अर्धा तास रस्त्यावर हा हाय व्होल्टेज ड्रामा सुरू होता.

कुणीतरी या घटनेचा व्हिडीओ शुट करुन सोशल मीडियावर व्हायरल केला. हा व्हिडिओ आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दोन मुली रस्त्यावरुन जात होत्या. यावेळी जवळच्या परिसरात राहणारा एक तरुण त्यांचा पाठलाग करत होता. थोड्या वेळानंतर या मुलींना रस्त्यावर थांबवले आणि काहीतरी म्हणाला.

यानंतर या मुली चांगल्याच संतापल्या आणि दोघांनी या मुलाला चपलेने मारहाण केली. मुलाला मारहाण करताना एक मुलगी पुन्हा पुन्हा बोलत होती “अब तू मर और बोल आई लव यू”. यावेळी तब्बल अर्धा तास रस्त्यावर हा हाय व्होल्टेज ड्रामा सुरू होता.दरम्यान, याप्रकरणी आता कमला नगर पोलीस ठाण्याचे प्रमुख विपिन कुमार यांनी सांगितले की, दोन्ही मुली आणि एक मुलाचा मारहाणीचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून पोलीस याप्रकरणी तपास करत असल्याचे त्यांनी सांगितले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close