55 वर्षाच्या प्राध्यापका कडून फार्मसी विषयात पास करुन देण्याचे आमिष दाखवत अनैसर्गिक कृत्य

संभाजी नगर / नवप्रहार न्यूज नेटवर्क
आपल्या समाजात गुरूंना महत्वाचा दर्जा आहे . आई वडिलां नंतर जर कोणाला महत्वाचे स्थान असेल तर ते आहे गुरूला. पण वैजापूर शहराजवळ असलेल्या रोटेगाव परिसरातील एका फॉर्मसी कॉलेज च्या प्राध्यापकाने एका तरुणाला फॉर्मसी अभ्यासक्रमात पास करण्याचे आमिष देत त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला आहे. या घृणीत कृत्याची चित्रफीत व्हायरल झाल्यावर हे प्रकरण चव्हाट्यावर आले आहे.यानंतर मात्र प्राध्यापक पसार झाला आहे. तर नातवाच्या वयाच्या मुलासोबत असले कृत्य करण्याची ईच्छा होतेच कशी असा प्रश्न जनतेकडून उपस्थित केला जात आहे..
याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिक- छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावरील वैजापूर शहरानजीक असलेल्या रोटेगाव परिसरात फार्मसी महाविद्यालय आहे. या महाविद्यालयात औषधी निर्माणशास्त्राचे पदवी व पदविका अभ्यासक्रम शिकविले जातात. याच महाविद्यालयातील एका 55 वर्षीय प्राध्यापकाची वैजापूर शहरातील एका युवकाशी ओळख झाली. ओळख झाल्यानंतर या बहाद्दराने ‘तुला मी फार्मसी महाविद्यालयात प्रवेश देऊन उत्तीर्ण करून देता’ असे आमिष दाखवून त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केले. या घृणीत कृत्याची चित्रफित समाज माध्यमांवर प्रसारित झाल्यामुळे प्राध्यापकाच्या प्रतापाचे बिंग फुटले. त्याच्या या ‘कर्तृत्वामुळे’ महाविद्यालय प्रशासनासह संस्थाचालकास शरमेने मान खाली घालण्याची नामुष्की ओढवली गेली.
प्राध्यापक, शिक्षकांना आजही समाजात आदर व मानाचे स्थान आहे. परंतु या अर्ध्या वयाच्या वृध्द प्राध्यापकाने युवकासोबत अनैसर्गिक कृत्य करून शिक्षकी पेशाला बट्टा लावून समस्त गुरूजींच्या इज्जतीची लक्तरे वेशीवर टांगली आहे. महाविद्यालय प्रशासन या प्राध्यापकाबाबत काय निर्णय घ्यायचा तो घेईलच. परंतु त्याने आणखी किती युवकांना आमिष दाखवून त्यांच्यासोबत अशा ‘लीला’ केल्या? हा एक संशोधनाचा विषय आहे. तर सद्या वैजापूर तालुक्यात हा चर्चेचा विषय बनला आहे.
दरम्यान हा प्रकार उघडकीस आल्यानंतर समाज माध्यमांवर प्रसारित झालेल्या चित्रफितीने जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे. दरम्यान हे प्रकरण पोलिस यंत्रणेपर्यंत गेले आहे. त्यामुळे संस्थाचालकांसह प्राध्यापकामागे पोलिसांच्या चौकशीचा ससेमिरा लागण्याची शक्यता आहे. पण आतापर्यंत पोलिसांनी या प्रकरणी कोणतेही अधिकृत कारवाई केली नसून, पोलिसांकडे देखील याबाबत कोणतेही लेखी तक्रार आलेली नाही.
महाविद्यालयातील एका 55 वर्षीय प्राध्यापकाची वैजापूर शहरातील एका युवकाशी ओळख झाली आणि त्यातून दोघांची मैत्री देखील झाली. दरम्यान ओळख झाल्यानंतर या बहाद्दराने प्राध्यापकाने या तरुणाला फार्मसी महाविद्यालयात प्रवेश देऊन उत्तीर्ण करून देण्याचे आश्वासन दिले. तर पुढे आमिष दाखवून त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केले. मात्र या घटनेची चित्रफित समाज माध्यमांवर प्रसारित झाल्यामुळे प्राध्यापकाच्या प्रतापाचे बिंग फुटले.
अश्या प्रकरणात तक्रारीची आवश्यकता नसते- कायदेतज्ञा नुसार अश्या संवेदनशील प्रकरणात तक्रारीची आवश्यकता नसते. कारण हा सामाजिक प्रश्न असल्याने पोलीस स्वतः यात फिर्यादी बनू शकतात. यापूर्वी घडलेल्या अश्या प्रकारच्या घटनेत पोलीस स्वतः फिर्यादी बनल्याची अनेक प्रकरणे आहेत.