न.प.हद्दीतील बांधकाम घेतले जातात ४० ते ४५% कमी दरात
बांधकामाचा दर्जा घसरणार का ?.
वरूड/तूषार अकर्ते
शेंदुरजनाघाट शहरातील न.प.कडून होणारे बांधकाम हे संबधित ठेकदाराकडुन अती कमी दरात होत असल्याने बांधकामाचा दर्जा घसरणार का अशी भीती सामान्य नागरिकांना भेडसावत आहे.
सध्या शे.घाट नगरपरिषद शहरात दलीत वस्तीच्या निधी अंतर्गत ५ ते ६ जागी कामे सुरू असुन ४० ते ४५ % कमी दराने कामे ठेकेदाराकडुन केली जात आहे.अशा परिस्थितीत या नगरपरिषदेला कायमस्वरूपी अभियंता नसल्याने ठेकेदारावर सुद्धा प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. वरूड न.प.येथील अभियंता शरद खाडे यांच्या कडे शे.घाट न.प.चा प्रभारी चार्ज असल्याने ते सुद्धा १० ते १५ दिवसानंतर कामावर लक्ष देत असल्याचे दिसून येतात.या मुळे सध्या स्थितीत ठेकेदाराचा मनमानी कारभार सुरू असल्याचे दिसून येत आहे.या मुळे बांधकामाचा दर्जा सुद्धा खालावत चाललेला आहे. या व्यतिरिक्त असे ही आढळून आले की ठेकेदार हे पुर्ण झालेल्या कामाचे मोजमाप करून स्वताहाच बिले बनवतात व अभियंत्यासमोर सादर करतात या सर्व घोळामुळे झालेल्या कामत अनियमितता व मोठ्या प्रमाणात गैरप्रकार तर नाही ना असा प्रश्न सुद्धा नागरिकांमध्ये भेडसावत आहे. त्या मुळे शे.घाट नगरपरिषदेला कायमस्वरूपी अभियंता देण्यात यावा तसेच होत असलेल्या कामाची चौकशी करून सदरील कामे योग्य पद्धतीने होत आहे की नाही यावर प्रशासनातील वरीष्ठ अधिका-यांकडून शहनिशा करून च बिलाचे देयक द्यावे. तसेच सुरू असलेल्या कामावर त्या कामाचे इस्टीमेटचे फलक लावावे अशी मागणी आता जोर धरत आहे.