15 वर्षाच्या मुलाला कोर्टाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा

कायदा हा सगळ्यांसाठी सारखाच असतो असे म्हटल्या जाते. अल्पवयीन मुलांना त्यांच्या वयाचा विचार करता शिक्षा न करता त्यांना बालसुधार गृहात पाठवल्या जाते. पण कोर्टाने एक 15 वर्षाच्या मुलाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. प्रकरण अमेरिकेतील आहे. अल्पवयीन मुलाला ईतकी कठोर शिक्षा सूनवल्याची बहुधा ही पहिलीच वेळ असावी असे बोलल्या जात आहे.
एका खटल्यात एका 15 वर्षीय किशोरवयीन मुलाला त्याच्या अत्यंत जघन्य गुन्ह्यांबद्दल एका अमेरिकन कोर्टाने शिक्षा सुनावली, तेव्हा कोर्टात उपस्थित असलेल्या लोकांची चांगलीच तारांबळ उडाली. एवढ्या मोठ्या शिक्षेची कल्पनाही किशोर आणि त्याच्या वकिलाने केली नसेल. मात्र किशोरने केलेला अत्यंत क्रूर गुन्हा लक्षात घेऊन न्यायालयाने त्याच्या वयाचा विचार न करता निर्भीडपणे निकाल दिला आणि तिथे उपस्थित लोकांची मने हेलावून गेली. या तरुणाच्या गुन्ह्याबद्दल जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल की तो त्याच्या वयात एवढा मोठा गुन्हा कसा करू शकतो? पण हे खरं आहे. आता आम्ही तुम्हाला संपूर्ण प्रकरण सांगतो.
खरे तर ज्या गुन्ह्यासाठी अमेरिकन कोर्टाने किशोरला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे ती गोष्ट खूपच भयानक आहे. त्यामुळे या खटल्याची सुनावणी करताना अमेरिकेतील पॉन्टियाक येथील न्यायाधीशांनी अशी कठोर शिक्षा जाहीर केली. अमेरिकेतील ऑक्सफर्ड हायस्कूलमध्ये चार विद्यार्थ्यांची हत्या करून इतरांच्या मनात भीती निर्माण केल्याप्रकरणी दोषी किशोरला ही शिक्षा देण्यात आली आहे. हा तरुण मिशिगनचा आहे. शुक्रवारी न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
बचाव पक्षाचे युक्तिवाद फेटाळले
न्यायालयाने त्याला शिक्षा सुनावताना किशोरचा क्रूर गुन्हा लक्षात ठेवला आणि त्यामुळे बचाव पक्षाचे सर्व युक्तिवाद फेटाळले. न्यायाधीश क्वामे रोवे यांनी बचाव पक्षाच्या वकिलांच्या कमी शिक्षेची विनंती नाकारली आणि 17 वर्षीय अँथनी क्रंबलीला पॅरोलसाठी संधी देऊ नये असा निर्णय दिला. 2021 मध्ये त्याच्या शाळेत झालेल्या हल्ल्याच्या वेळी क्रंबली 15 वर्षांचा होता. “मी जे करायचे ते मी केले, मी स्वतःला थांबवू शकलो नाही. मी भयानक गोष्टी केल्या.” असे क्रंबलीने शिक्षा सुनावण्यापूर्वी सांगितले.




