एचआर मॅनेजरची हत्या, गुडगावला गेला होता लग्नाची खरेदी करायला


दिल्ली पोलिसांनी युवराज सिंग मनचंदा यांच्या कथित हत्येप्रकरणी त्यांची माजी सहकारी अन्या वत्स आणि तिचा साथीदार संयम सचदेवा यांना अटक केली आहे. या हत्येमागे आर्थिक वाद असल्याचा पोलिसांना संशय आहे. या घटनेत मन हेलावून टाकणारी स्टोरी समोर आलीये.लग्नाची खरेदी करण्यासाठी गेला अन्…
पोलिसांच्या माहितीनुसार, युवराज लग्नाची खरेदी करण्यासाठी घरातून बाहेर पडला होता. याच दरम्यान, त्याचे अन्या आणि संयम यांच्याशी भांडण झाले. त्यानंतर त्यांनी त्याच्या मानेवर दोन गोळ्या झाडून त्याला ठार केले. त्यांनी त्याचा मृतदेह सात तास त्यांच्या क्रेटा कारमध्ये ठेवला. नंतर त्यांनी तो सेक्टर 70 मधील एका गटारात फेकून दिला आणि उत्तराखंडला पळून गेले. पोलिसांनी उत्तराखंडमधून त्या दोघांना अटक केली आहे.
पाच दिवस काहीच पत्ता नाही
पोलिसांच्या माहितीनुसार, युवराज सिंग मनचंदा 6 सप्टेंबर रोजी दिल्लीतील लाजपत नगर येथील सेंट्रल मार्केटमध्ये आपल्या बहिणीसोबत लग्नाच्या खरेदीसाठी गेला होता. वराजने आपल्या बहिणीला सांगितले की त्याची गुरुग्राममध्ये एक मीटिंग आहे आणि तो रात्री 10 वाजेपर्यंत घरी परत येईल. युवराज रात्र होईपर्यंत घरी परतला नाही. त्याचा फोन बंद असल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला. पाच दिवस त्याचा काहीच पत्ता न लागल्याने अखेर पोलिसात तक्रार देण्यात आली होती.सीडीआर रिपोर्टमधून आरोपींचा शोध




