हटके

त्याची भविष्यवाणी ऐकून तुम्हाला ही भरेल धडकी ; त्याच्या दोन भविष्यवाण्या ठरल्या आहेत खऱ्या 

Spread the love

                   आपले भविष्य जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्यांनाच असते. कारण भविष्यात काय दडलंय याबद्दल सर्वसामान्यांना काही माहिती नसते. पण काही लोकांकडे एक अशी दैवीशक्ती असते, की ते भविष्यात काय होणार आहे याचा अचूक अंदाज सांगतात. अश्या लोकांना भविष्यवेत्ता म्हणतात. यातील काही भविष्यवेत्ता तर जगात कधी काय घडणार आहे हे देखील सांगतात. बाबा वेंगा आणि नास्त्रेदमस हे जगप्रसिद्ध भविष्यावत्ते म्हणून परिचित आहेत. कारण यांनी हजरो वर्षांपूर्वी येणाऱ्या हजारो काळात काय घडणार आहे हे सांगितले होते. आणि ते अचूक ठरले आहे.

          पण अलीकडच्या काळात एक तरुण भविष्यवेत्ता म्हणून समोर आला आहे. या तरुणाने केलेल्या दोन्ही भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत. भविष्यवाणीच्या बाबतीत हा व्यक्ती बाबा वेंगांपेक्षा काही कमी नाहीये, त्याचं नाव निकोलस औजुला असं आहे. निकोलस अैजुला याचं वय 38 वर्ष आहे. आपण भविष्यवेत्ता असल्याचा दावा या व्यक्तीकडून करण्यात येतो. निकोलस अैजुला याने कोरोना महामारी, ट्रम्प यांचा विजय आणि ब्लॅक लाईव्ह मॅटर मुव्हमेंट अशा तीन भविष्यवाणी केल्या होत्या, त्या खऱ्या ठरल्याचा दावा केला जातो.आता 2025 बाबत देखील निकोलसने खूपच भयावह भविष्यवाणी केली आहे. 2025 ला तिसरं महायुद्ध होऊ शकतं असं त्याने म्हटलं आहे.मानव जातीला लाज वाटेल अशा काही घटना या वर्षात घडतील असंही त्याने म्हटलं आहे.

काय आहे निकोलस अैजुला याची भविष्यवाणी?

द मिरच्या एका रिपोर्टनुसार निकोलस औजुला हा आपल्या भविष्यवाणीसाठी जगप्रसिद्ध आहे. त्याने कोव्हिड 19 आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाबाबत भविष्यवाणी केली होती ती खरी ठरली आहे. निकोलस याने 2025 मध्ये तीसरं महायुद्ध होऊ शकत, धर्म आणि राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर हत्या, मारामाऱ्या अशा घटना घडतील. प्रचंड पाऊस पडेल जगावर पुराचं संकट येईल जगात महागाई प्रचंड वाढेल अशी भविष्यवाणी केली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close