काशीच्या शिवलिंगाप्रमाणे लंकेनाथा धाम मंदिरातील शिवलिंग भक्तांची काशी
मंदिरातील नंदी पश्चिममुखी तर नदी उत्तरदिशी वाहत असल्याने या नदीला घामाचे महत्व,
रस्त्यासाठी केंद्रीय मंत्री यांना निवेदन.
नेर:- नवनाथ दरोई
नेर पासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या शिवकालीन हेमाडपंती मंदिर आहे.मंदिराच्या गाभाऱ्यात पुरातन उत्तरमुखी शिवलिंग आहे. शिवलिंगाचा आकार 125 सेंटीमीटर लाब 89 सेंटीमीटर रुंद व 13 सेंटीमीटर उंची असून शिवलिंगाच्या वरच्या भागावर 8 सेंटीमीटर लांब व 4 सेंटीमीटर रुंदीच्या 12 शिवलिंगाच्या पिंडी कोरलेल्या आहे. काशीच्या मंदिरात जसे शिवलिंग आहे तसेच हे शिवलिंग आहे. या मंदिरातील नंदी हा पश्चिममुखी असून मंदिराच्या समोरील भागातून उत्तर नदी वाहत असल्याने या नदीला धामाचे महत्व प्राप्त झाले. या नदीवर जन्मापासून तर मृत्यूपर्यंतचे सर्वच कार्यक्रम करण्यात येते. शिवपुरानातही अशा ठिकाणाला धामाचे महत्त्व असल्याचे विशेद केले आहे.लंकेनाथ धाम हे निसर्गरम्य वातावरणात असल्यामुळे या स्थळाकडे पर्यटन स्थळ म्हणूनही बघितले जाते. श्रावण महिन्यात हा परिसर हिरवागार झालेला असल्याने पर्यटन या स्थळी येउन आनंद लुटत असताना दिसून येते. श्रावण महिन्यात या शिवलिंगाच्या दर्शनासाठी विर्दभातुन अनेक भाविकभक्त दर्शनासाठी येतात. महाशिवरात्रीला या परिसरात यात्रा भरविण्यात येते.येणाऱ्या भक्तासाठी येथील सभा मंडपात ऊसळ,फराळाचा चिवडा,केसरयुक्त दुधाचे वाटप केल्या जाते. लंकेनाथ धाम परिसरातील शिवारात अनेक शेतकऱ्याचे जमीन असल्यामुळे त्या शेतातील हिरवळाने तो परिसर वाताणूकुलीत जाणवतो. गेल्या काही वर्षाआधी चवऱ्याच्या जाणे म्हणजे कठीण होते. तो रस्ता अवघड होता. तसाच रस्ता या लंकेनाथ धामकडे जाण्यासाठी आहे. रस्ता खडतर असल्याने कुठलेही वाहन मंदिराच्या पायऱ्या पर्यंत पोहोचत नाही.अर्धा किलोमीटर अंतरावर वाहने ऊभी करून पायदळ मंदिराकडे वाटचाल करावी लागते. याकडे यवतमाळ वाशीम जिल्हाचे पालक मंत्री संजय राठोड यांनी दुलंक्ष केल्याने,हा रस्ता करण्यात यावा यासाठी राष्ट्रीय विचार मंचाच्या वतीने केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना निवेदन देण्यात आले.