मित्राचा अपघाती मृत्यू , महिला मित्राने उचलले टोकाचे पाऊल

काय आहे नेमकं प्रकरण?
पूजा माने असं युवतीचं नाव आहे. ती सातारा जिल्ह्यातीलच खटाव तालुक्यातील मानेवाडी येथील राहणारी होती. शिक्षणासाठी घरपासून दूर राहिलेली पूजा आपल्या भविष्याची स्वप्नं पाहत होती, पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं.
काही दिवसांपूर्वी पूजा आणि तिचा खास मित्र कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन परतत असताना त्यांच्या स्कॉर्पिओ गाडीला भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत पूजाच्या खास मित्राचा जागीच मृत्यू झाला. डोळ्यांसमोर घडलेल्या या भयानक आघाताने पूजाला पूर्णपणे कोलमडून गेली होती.
धक्क्यातून सावरू शकली नाही
मित्राच्या अकाली जाण्याचं दुःख पूजाच्या मनावर इतकं भयंकर परिणाम करून गेलं की, ती या मानसिक धक्क्यातून बाहेर येऊ शकली नाही. सतत डोळ्यांसमोर येणारे त्या अपघाताचे प्रसंग आणि मित्राच्या विरहाची सल तिच्या मनाला कुरतडत होती. याच नैराश्यातून आणि तीव्र दुःखातून तिने सातारा येथील यशोदा टेक्निकल कॅम्पसच्या वसतिगृहात गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं.

