शैक्षणिक

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था वरुड येथे दीक्षांत समारोह संपन्न

Spread the love

 

विद्यार्थ्यांनी यशस्वी जीवनाकरिता “थ्री ए” या त्रिसूत्रीचा अवलंब करावा.- अजय देशपांडे ( प्रसिद्ध साहित्यिक)

वरुड (प्रतिनिधी).
विद्यार्थी जीवनामध्ये विद्यार्थ्यांनी यशस्वी व्हायचे असेल तर accept, adjust व avoid या त्रिसूत्रीचा अवलंब करावा. असे मनोगत प्रसिद्ध साहित्यिक व यशवंत चित्रपटाचे लेखक प्रा.अजय देशपांडे यांनी व्यक्त केले. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था वरुड येथील दीक्षांत समारंभामध्ये प्रमुख वक्ता म्हणून ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की,विद्यार्थ्यांनी आपल्या आर्थिक,सामाजिक,कौटुंबिक परिस्थितीचा तसेच शारीरिक व बौद्धिक क्षमतेचा स्वीकार करावा, परिस्थितीशी जुळवून घ्यावे व वाईट संगतीचा,विचारांचा त्याग करावा तरच आपण आपले ध्येय प्राप्त करू शकतो. याप्रसंगी मोर्शी मतदारसंघाचे आमदार देवेंद्रजी भुयार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते तर गुरुदेव सेवा मंडळाचे चोरोडे गुरुजी मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. जि प सदस्य राजेंद्रजी बहुरूपी, रा.काँ.चे तालुकाध्यक्ष बाळूभाऊ पाटील, वीरू भाऊ देशमुख प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते, संस्थेचे प्राचार्य व्हि.आर.पडोळे सर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाचे मार्गदर्शक आदरणीय चोरोडे गुरुजी यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मौलिक असे प्रबोधन केले.
भारताचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रन फॉर युनिटी या स्पर्धेतील विजयी खेळाडूना मान्यवरांच्या शुभहस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. तसेच सर्वोत्कृष्ट गुण प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आल्यात.
कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता . एन व्ही गायकी, सौ सी.एस बाळे,. मेघा चार थळ, सचिन गणोरकर, पी.ए कचरे, जी जी फुटाणे, एन बी दारोकर, एच.डी फुटाणे, एन बी दारोकर, एस डी कराळे, ए.एम खापरे,आर डब्ल्यू माथनकर, फरकाडे, चढवकर या प्राध्यापकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुंदर संचालन अशोकराव खापरे सर यांनी केले तर सौ.सी. एम.बाळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close