खोटी खरेदी करून जमीन हडपळ्याची मयत झालेल्या सयाबाईच्या वारसाची पोलिसात तक्रार.
कारंजा.. श. प्र.
तालुक्यातील उंबर्डा बाजार येथील रहवासी अनुसयाबाई भुजाडले याचे मौजे यावर्डी येथे 1.65 आर जमीन वाईतदार विनायक बोनके यांनी हडप केल्याची तक्रार कारंजा ग्रामीण पोलिसात तिचे नातू श्रीकृष्ण सोनोने रा उंबर्डा बाजार यांनी केली आहे. सविस्तर हकीगत अशी कि मौजे उंबर्डा येथील रहवाशी अनुसयाबाई भुजाडले यांना पाच मुली असून तिचे नावे मौजे यावर्दी येथे 1.65 आर जमीन होती ती तिने नदकिशोर विनायक बोनके यांना वहितीसाठी दिली आणि आपल्या मुली आणि जावई यांना करणे शक्य होत नसल्याने अनेक दिवस याच कुटुंबाने शेती वर वहीती केली मात्र तिचा मुर्त्यू नंतर तिचे वारस असलेल्या मुलीचा मुलगा याने सादर जमिनी बाबत विचारणार केली असता सदर जमीन विकत घेतल्याचे सांगितले त्यानंतर सोनोमे यांनी या शेतीची चौकशी केली असता आजीच्या मुर्त्या नंतर सदर शेतविक्रीचा व्यवहार झाल्याची घटना उघडकीड आली आहे.यावेळी खरेदी करताना शेतीची मालक असणाऱ्या अनुसयाबाई भुजाडले याचा फोटो न लावता खरेदी खतावर वच्छला बाई बोनके यांचा फोटो लावलेला आहे त्यामुळे सादर खरेदी ही खोटी असून खोटी खरेदी करणाऱ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून मुळमालक असणाऱ्या अनुसयाबाई भुजाडले याचे वारसाना त्याचा मोबदला मिळावा यासाठी अनुसयाबाई याचे नातू श्रीकृष्ण अवधूत सोनोने यांनी पोलिसात तक्रार दाखल करून त्याच्या नदकिशोर बोनके, वच्छलाबाई विनायक बोनके संगीता विनायक बोनके याचेवर कार्यवाही करण्याची मागणी केली असून याच्या प्रति जिल्हाधिकारी जिल्हा दुय्यम निबंधक आयुक्त यांना पाठवील्या आहेत.
खोट्या खरेदीवर आधारावर फसवणूक करीत त्यांनी हे शेत विकल्याने आणि हा व्यवहार खोटा असल्याचे समताच पुन्हा या शेताला विकून व्यवहार झाला आहे त्यामुळे संबंधित गैरप्रकाराला उघड करून मुळ वारसना त्याचा लाभ देण्याची मागणी अनुसयाबाई भुजाडले याचे वारसानी केली आहे.